स्वाभिमानी मराठा महासंघाच्या नाशिक विभाग कार्याध्यक्षपदी रावसाहेब कावरे यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 5, 2021

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या नाशिक विभाग कार्याध्यक्षपदी रावसाहेब कावरे यांची निवड

 स्वाभिमानी मराठा महासंघाच्या नाशिक विभाग कार्याध्यक्षपदी रावसाहेब कावरे यांची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार  ,जळगाव , येथील मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी  तसेच मराठा समाजातील शेतकरी, तरुण, विद्यार्थी आदींचे संघटन बळकट करण्यासाठी  रावसाहेब भाऊसाहेब कावरे यांची नुकतीच  नाशिक विभाग कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. तशा आशयाचे पत्र त्यांना स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले पाटील यांनी नुकतेच दिले .
संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजाला बळकट करण्याचे  आणि योग्य दिशा देण्याचे काम या पदाच्या माध्यमातून करावे  असे आवाहन या वेळी डॉ. टकले यांनी केले.यावेळी देविदास ओंबळे,अनिल कोलते, राजेंद्र कावरे ,योगेश निमसे, राजेंद्र बोर्डे, अभिजीत कावरे, नितीन निकम, लहू खाटीक ,सुनील कात्रस, विक्रम खाटीक ,सदाशिव जाधव, गणेश झगरे पाटील,  किशोर साबळे, दत्तात्रय शेळके आधी स्वाभिमानी मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून श्री कावरे यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment