जागतिक महिला दिन - तरूणी व महिलांसाठी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 3, 2021

जागतिक महिला दिन - तरूणी व महिलांसाठी

 जागतिक महिला दिन - तरूणी व महिलांसाठी

चष्मा व दृष्टीदोष असलेल्यांसाठी लेसर नेत्रशस्त्रक्रिया शिबीर

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः चष्मा किंवा दृष्टीदोष असलेल्यांना आपल्या आयुष्यात बर्याच समस्यांना सामोरे जावे लागते. युवकांना सैन्यभरती, पोलिस भरती, पायलट, नेव्ही, एम पी एस सी, यु पी एस सी ह्या सारख्या संधी सोडून दयाव्या लागतात तर युवतींना चष्मा व दृष्टीदोष असल्यास लग्नास नकार दिला जातो. बर्याच मुलींची लग्न होत नाहीत ही एक मोठी सामाजिक समस्या असून ह्यासाठी अहमदनगरच्या डॉ. कांकरियांच्या साई सूर्य नेत्रसेवा ह्या संस्थेतर्फे मागील 35 वर्षांपासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लेसर नेत्रशस्त्रक्रियेद्वारे हा दृष्टिदोष घालवून व चष्म्यापासून कायमची मुक्ती मिळवून देण्यासाठी ‘विवाहदृष्टीभेट’ योजना रबविली जाते ह्या विशेष लेसर नेत्रशस्त्रक्रिया शिबीरात युवती व महिलांना विशेष सवलत दिली जाते. अशी माहिती ह्या शिबीराच्या संयोजिका नेत्रतज्ञ डॉ. सौ. सुधा कांकरिया ह्यांनी दिली. आजपर्यंत ह्या शिबीरातून उपचार झाल्यानंतर स्वत: लग्न पत्रिका आणून देण्याची प्रथा बर्याच युवती पाळतात व अशा 12 हजाराहून अधिक लग्नपत्रिका आम्हाला प्राप्त झाल्या आहेत व ह्याचा आम्हाला मोठा आनंद आहे. असे नेत्रतज्ञ डॉ. सौ श्रृतिका कांकरिया ह्यांनी सांगितले. - 0.5 पासून -30.0 पर्यंत व +18.0 पर्यंत नंबर घालविण्याच्या एकूण दीड डझनापेक्षा अधिक पध्दती एकाच छताखाली असणारी साई सूर्य नेत्रसेवा ही अहमदनगरची संस्था भारतातील पहिली संस्था असून त्यात मागील 2 वर्षा पासून कॉन्टयूरा ही जगातील सर्वात आधुनिक लेसर उपचार पध्दती भारतात प्रथमच आणून ती लॅसीक व स्माईल ह्या उपचार पध्दती पेक्षा अधिक अचूक व परिणामकारक ठरली आहे. ह्यामध्ये नुसता चष्म्याचा नंबरच जात नाही तर चष्म्यापेक्षा अधिक चांगले विनाचष्मा दिसते ह्या कॉन्टयूरा लेसर उपचार पध्दतीचा देखील लाभ ह्या शिबीरात मिळणार आहे. ह्या शिबीरात साई सूर्य नेत्रसेवा अहमदनगर बरोबरच एशियन आय हॉस्पिटल पुणे यांचाही सहभाग राहणार आहे.
कोविड संसर्गामुळे एकाच दिवशी गर्दी न करता 8 मार्च पर्यंत नांवनोंदणी करणार्‍यांना पुढच्या तारखा दिल्या जातील व सर्व प्रकारची काळजी घेण्यात येणार आहे. ज्यांना चष्मा व दृष्टीदोष आहे त्यांनी 9112288611 ह्या नंबरवर संपर्क करणे आवश्यक आहे. ह्या नेत्रशिबीरामध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीचे नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वर्धमान कांकरिया ह्यांची संपूर्ण टीम सहभागी होणार आहेत. त्याचा मोठा फायदा रूग्णांना होणार आहे. संपर्क साई सूर्य नेत्रसेवा, माणिक चौक, अहमदनगर 414001 फोन 9112288611/8888982222 आणि एशियन आय हॉस्पिटल, ससुण रोड, पुणे फोन 02026162424/8888942222

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here