बोठेला 23 पर्यत पोलिस कस्टडी! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 20, 2021

बोठेला 23 पर्यत पोलिस कस्टडी!

 बोठेला 23 पर्यत पोलिस कस्टडी!

तपासात सहकार्य करीत नसल्याचा सरकारी वकिलांचा युक्तीवाद 


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे आज त्याला पारनेर न्यायालयात हजर केले असता त्याला आणखी तीन दिवसांची पोलिस कस्टडी देण्यात आली आहे.आरोपीचे वकील व सरकारी वकील या दोन्हींचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश उमा बोर्‍हाडे यांनी 23 मार्च पर्यंत बोठे यास पोलीस कस्टडी सुनावली आहे.

आरोपीचे वकील अ‍ॅडवोकेट अक्षय गोसावी मुंबई, संकेत ठाणगे व  महेश तवले   यांनी युक्तिवाद केला. न्यायालयासमोर बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणात दोषीचा सहभाग मर्यादित स्वरूपाचा आहे. प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग नव्हता, त्यांचा मोबाईल फोन यापूर्वीच जप्त करण्यात आलेला आहे. आता केवळ तपासात टेक्निकल बाबीच उरलेल्या असल्याने त्यांना पोलिस कोठडी देण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणणे बोठे याच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडले.यावेळी तपासी अधिकारी,पोलिस उपाधीक्षक मनोज पाटील यांनी रिमांड रिपोर्ट वाचून दाखविला. यामध्ये बोठे वापरत असलेला आयपॅड, मोपेड गाडी हस्तगत करायचे आहे, तसेच या गुन्ह्यात व फरार होण्यात बोठे याला कोणी मदत केली, खून घडला त्या ठिकाणापासून ते नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत कोणी वॉच ठेवला, गुन्ह्याचे नेमके कारण काय तसेच या काळात बोठे याने कोणा-कोणाशी, कसा पत्रव्यवहार केला? हा तपास होणे बाकी असल्याचे तपासी अधिकारी मनोज पाटील यांनी न्यायालयासमोर मांडले. सरकारी वकील अ‍ॅड. मनीषा दुबे यांनीही सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडली.

न्यायालयाच्या आवारात आरोपीची पत्नी सविता बोठे, मुलगा यश बोठे तसेच आरोपी च्या भावासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment