एमआयडीसी येथे कंपनीतील घरात घुसून महिलेचा विनयभंग - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 8, 2021

एमआयडीसी येथे कंपनीतील घरात घुसून महिलेचा विनयभंग

 एमआयडीसी येथे कंपनीतील घरात घुसून महिलेचा विनयभंग

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः एमआयडीसी येथे कंपनीतील घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिलीप दगडू सिनारे, निखिल दिलीप सिनारे, प्रशांत दिलीप सिनारे, सागर दिलीप सिनारे, मागाडे शैलेश, पगारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत महिला एमआयडीसी येथे राहत असून, दि.4 मार्च रोजी रात्री 10:30 वाजता कंपनीतील घरात स्वयंपाक करीत होती. कंपनीच्या गेट व भिंतीवरून उड्या मारून सदर आरोपी स्वयंपाक करीत असलेल्या ठिकाणी आले. आमच्या घरी कामाला चल, तुला इथल्यापेक्षा जास्त पगार देण्याचे सांगितले. त्यांना बरोबर येण्यास नकार दिला असल्याचा राग येऊन त्यापैकी एका व्यक्तीने अंगाला झटून चावी काढून घेतली. तर चावीद्वारे कंपनीचे कार्यालय उघडून सीसीटीव्ही कॅमेरा, संगणक, ऑफिसचे केबीन व खिडक्यांची तोडफोड केली. त्यांच्या पाठीमागे गेले असता, या मधील काही व्यक्तींनी कपडे फाडून विनयभंग केला. तर शिवीगाळ करुन मारहाण केले. सदर आरोपींची अडवणुक करणार्या आरोपींनी पती व मुलाला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. तर आरोपी पांढर्या रंगाच्या स्कॉर्पिओ व स्विफ्ट कारमधून पसार झाले असल्याचे फिर्यादीत पिडीत महिलेने म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here