जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीप्रकरणी शिवसेना पदाधिकार्‍याने दिली तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 17, 2021

जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीप्रकरणी शिवसेना पदाधिकार्‍याने दिली तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी

 जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीप्रकरणी शिवसेना पदाधिकार्‍याने दिली तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शासनाच्या भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी घेणार-देणार, साक्षीदार व संबंधीत अधिकारी तसेच या योजनेचा दुबार लाभ घेणार्यावर गुन्हे दाखल करुन कारवाईची मागणी केल्याप्रकरणी सबंधित व्यक्ती व शिवसेनेच्या पदाधिकार्याकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने सदर व्यक्तींवर कारवाई करुन कुटुंबीयांना संरक्षण मिळण्याची मागणी तक्रारदार रघुनाथ आंबेडकर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रघुनाथ आंबेडकर भाळवणी (ता. पारनेर) येथे आपल्या कुटुंबीयांसह राहत आहे. गावातील छबु गोविंद आंबेडकर यांनी  भूमिहीन कुटुंब म्हणून सरकारकडून भूखंड गटनंबर 651 व दुसरा सरकारी भूखंड गट नंबर 701/6 असे दोन सरकारी भूखंड सरकारला फसवून घेतले. एका व्यक्तीला भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनी नियमाप्रमाणे दोनदा घेता येत नाही व त्याची विक्री देखील करता येत नाही. छबु आंबेडकर यांनी त्यापैकी गट नंबर 651 चा भूखंड विकास भाऊसाहेब रोहोकले व इतरांना दि.12 मार्च 2014 रोजी गैर मार्गाने विकण्यात आला. सदर प्रकरण रघुनाथ आंबेडकर यांनी जनहितार्थ सरकारच्या व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. सदर खरेदी, विक्री करणार्यांनी संगनमताने सातबारा उतार्यावर खाडाखोड करून खरेदी विक्री केलेली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने दि.6 जुलै 2015 रोजी संबंधित महसूल अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले. याचा राग धरुन जमीन विकणारे छबु आंबेडकर, घेणारे विकास रोहोकले व इतर व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी देण्याचे सत्र सुरु केले आहे. रोहोकले हे शिवसेनेचे पारनेर तालुकाध्यक्ष असल्याने राजकीय दबाव टाकून दडपण आनण्याचा प्रकार ते करीत आहे. त्यांनी मला व माझ्या मुलावर दोनदा विनयभंग केल्याच्या खोट्या तक्रारी पोलिस स्टेशनला देण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप रघुनाथ आंबेडकर यांनी केला आहे.    
यांच्या दबावाला बळी न पडता शासनाच्या भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सबंधीतांवर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. रोहोकले व त्याच्या इतर साथिदारांनी दि.1 मार्च रोजी दारू पिऊन राहत्या घरावर दगडफेक केली. शिवीगाळ करुन केलेली तक्रार मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे रघुनाथ आंबेडकर यांनी निवेदनात म्हंटले आहे. शासनाची फसवणुक करुन जमीन देणार, घेणार लॅण्ड माफिया व साक्षीदार यांच्यावर कारवाई करुन, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here