पारनेर तालुक्यातील अवैध वाळू उपसा व त्याची वाहतूक बंद करावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 22, 2021

पारनेर तालुक्यातील अवैध वाळू उपसा व त्याची वाहतूक बंद करावी

 पारनेर तालुक्यातील अवैध वाळू उपसा व त्याची वाहतूक बंद करावी

अन्यथा महसूल मंत्री ना. थोरात यांच्या निवासस्थानासमोर उपोषण

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पारनेर तालुक्यातील अवैध वाळू उपसा व त्याची वाहतूक बंद होण्यासाठी अनेक वेळा तक्रार व पाठपुरावा करून देखील कारवाई होत नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा व त्याची वाहतूक सर्रास सुरु आहे. हा अवैध वाळू उपसा व वाहतूक बंद होण्यासाठी संबंधित विभाग व अधिकार्यांना संघटनेच्या वतीने तक्रार करुन वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला.पारनेर तहसील व पोलीस प्रशासन यांचे वाळू व्यावसायिकांशी अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे जाणीवपूर्वक त्यांच्यावर कारवाई करण्याचे टाळले जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
प्रशासन व वाळू व्यावसायिक शासनाची दिशाभूल करीत असून, शासनाचा मोठ्या प्रमाणात महसुल बुडत आहे. तर अवैध वाळू उपसा व वाहतूकीचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
अवैध वाळू वाहतूकीमुळे या भागातील अनेक रस्ते खराब झालेले आहेत. सुसाट वेगाने वाळू वाहतूक करणार्या अनेक डंपरमुळे अपघात झाले असून, यामध्ये काहींचा जीव देखील गेलेला आहे. तरी देखील अज्ञात वाहनाची नोंद घेण्यात आली आहे. वाळू व्यावसायिकांची पारनेर भागांमध्ये मोठी दहशत असल्यामुळे कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही. वाळू व्यावसायिकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असताना पोलीस संरक्षण देखील देण्यात येत नसल्याचे जिल्हाध्यक्ष रोडे यांनी स्पष्ट केले आहे. अवैध वाळू व्यवसाय करणारे व वाहतूक करणार्या विरोधात 21 दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास 21 दिवसानंतर महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील निवासस्थानी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे

No comments:

Post a Comment