अ‍ॅड. उमेश चंद्र यादव यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 10, 2021

अ‍ॅड. उमेश चंद्र यादव यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती.

 अ‍ॅड. उमेश चंद्र यादव यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती.

रेखा जरे हत्या खटला प्रकरणी...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रेखा जरे हत्या प्रकरण खटल्यात फिर्यादीच्यावतीने बाजू मांडण्यासाठी अ‍ॅड. यादव यांची नियुक्ती करावी, अशी मागणी मयत जरे यांच्या कुटुंबीयांनी शासनाकडे केली होती.

या खटल्यात ख्यातनाम वकील अ‍ॅड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश नुकताच महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने जारी केला आहे. या नियुक्तीच्या अनुषंगाने मयत जरे कुटुंबीयांनी यादव यांच्या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. यशस्विनी महिला ब्रिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात 30 नोव्हेंबर रोजी संगनमताने कट करून धारदार शस्त्राचा वार करून हत्या केली होती. यात तपासाअंती सकाळ या वृत्तपत्राचा तत्कालीन कार्यकारी संपादक बाळ बोठे याचे नाव पुढे आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक अजित पाटील यांनी सखोल तपास करून आतापर्यंत पाच आरोपीना जेरबंद करून भक्कम पुराव्याच्या आधारे सदर प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. तथापि, या प्रकरणातील सूत्रधार बाळ बोठे अजून पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने तो कधी सापडणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here