निमगाव वाघात करणार दीड हजार झाडांची लागवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 26, 2021

निमगाव वाघात करणार दीड हजार झाडांची लागवड

 निमगाव वाघात करणार दीड हजार झाडांची लागवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे पावसाळ्यात दीड हजार झाडांची लागवड करण्यात येणार असून, या पार्श्वभूमीवर झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते खड्डे खोदण्याच्या कामाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी वन रक्षक अफसर पठाण, सतीश उधार, गणेश येणारे, संतोष रोहोकले आदींसह कामगार उपस्थित होते.
निमगाव वाघा ते कल्याण रोड (बारा खोंगळा मार्गे) व मिलन मंगल कार्यालय ते पिंपळगाव वाघा (जुन्नर रोड) रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दीड हजार झाडे लावण्यात येणार आहे. यासाठी खड्डे घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नगर तालुका सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल दिलीप जीरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे.

No comments:

Post a Comment