आ. संग्राम जगताप यांच्या रूपाने लोकाभिमुख आमदार मिळाला ः अ‍ॅड. शर्मा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 22, 2021

आ. संग्राम जगताप यांच्या रूपाने लोकाभिमुख आमदार मिळाला ः अ‍ॅड. शर्मा

 आ. संग्राम जगताप यांच्या रूपाने लोकाभिमुख आमदार मिळाला ः अ‍ॅड. शर्मा

प्रभाग 15 मध्ये आगरकर मळा परिसरात रस्ता डांबरीकराणाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शहर विकासाच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करीत असणारे युवा आमदार संग्राम जगताप हे नेहमीच अग्रेसर असतात. विकास कामाबरोबरच प्रत्येक नागरिकाचे वैयक्तीक प्रश्न समजावून घेऊन सोडविण्याचे काम करतात. प्रत्येकाच्या सुख-दु:खात सामिल होत असतात, असे प्रतिपादन अँड. आर. टी. शर्मा यांनी केले.
प्रभाग क्र. 15 मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून आगरकर मळा स्वामी समर्थ मंदिर परिसरामध्ये रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी शर्मा बोलत होते.  
यावेळी म.न.पा. उपायुक्त डॉ. प्रदिप पठारे, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, अँड. आर. टी. शर्मा, दत्तात्रय खैरे, अनिल शर्मा, अनिकेत आगरकर, सोमनाथ रोकडे, हेमंत थोरात, अभय श्रीश्रीमाळ, राजू आधळे, संतोष चुंबळकर, अशोक अकोलकर, बाळासाहेब ठाणगे, छोटू सुपेकर, भाऊ चौधरी, नंदू लाडगे, महाळू शिपनकर, राकेश साथखेडकर, संजय वांडेकर, सुरेश धोंडेकर, वंसत फिरोदिया, अतुल शिंगी, अमित गांधी, प्रकाश थोरवे, बाळकृष्ण डौलारे, हेमंत गुगळे, धिरज फिरोदिया, शरद मेहर आदी उपस्थित होते.
शर्मा म्हणाले, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा आमदार आपल्याला मिळाला आहे. म्हणून ते लोकाभिमुख आमदार म्हणून ओळखले जातात. कुठलेही काम फोन करून सांगितले तरी होत असते. स्वस्तिक चौकाकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे आगरकर मळा रेल्वे स्टेशन परिसरातील रहिवासींना व शाळकरी विद्यार्थ्यांना जाण्यायेण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. छोट्या मोठ्या अपघात होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झालेली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी याची दखल घेत राज्यसरकार कडून आगरकर मळ्यामध्ये विरंगुळा मैदान ते काटवन खंडोबा रस्ता ते आयुर्वेद कॉर्नर पर्यंतचा काँक्रिटीकरणचा रस्त्याच्या मंजूरीकामासाठी 8 कोटी रूपयाचा निधी मंजूरसाठी प्रयत्न करत असल्याचे
आमदार जगताप म्हणाले की, प्रत्येक नागरिकांनी कामाचे मुल्यमापन करून काम करणार्‍या माणसाच्या पाठिमागे उभे राहिले पाहिजे.
सक्कर चौक हा धोक्याचा चौक झाला असून काटवन खंडोबा रोडच्या काँक्रिटीकरणासाठीचा आराखडा सरकारकडे तयार करून दिला आहे. लवकरच मंजूरी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असून मंजूरी मिळाल्यानंतर कामाला सुरूवात होणार आहे. या माध्यमातून दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागेल. डिपी रस्त्याच्या विकास कामासाठी प्राधान्यक्रम दिले असल्यामुळे शहरीकरणाच्या विस्तारीकरणाला वाव मिळणार आहे, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना विजय गव्हाळे म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्यामुळेच रेल्वे स्टेशन, आगरकर मळा परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. सिनानदीवरील पुलाची निर्मिती करून या परिसराच्या सौंदर्यकरणात भर पडले आहे. या भागामध्ये अमरधामाची निर्मिती केली आहे. बहुतांश विकास कामे मार्गी लागली आहे. आम्ही नगरसेवक नसतांनाही आमदार संग्राम जगताप यांनी या भागाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. पुढील काळात या भागाचे सर्व प्रश्न मार्गी लागतील असे ते म्हणाले.
संभाजी पवार म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखील आम्ही सर्वजण काम करीत आहोत. विकासकामाना प्राधान्य क्रम देत आपआपल्या परिसरामध्ये विकास कामे सुरू आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन प्रभागातील विकास कामे मार्गी लावली जात आहे. या पुढील काळात विकासकामाबरोबरच सकारात्मक दृष्टीकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासत वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याचे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here