लॉकडाऊन! ठाकरे संभ्रमात! भाजपाचा विरोध! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 29, 2021

लॉकडाऊन! ठाकरे संभ्रमात! भाजपाचा विरोध!

 लॉकडाऊन! ठाकरे संभ्रमात! भाजपाचा विरोध!

मुंबई ः महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्या सध्या वेगाने वाढत आहे.याच पार्श्वभुमीवर राज्यात लॅाकडाऊन लावले जाणार अशी शक्यता बळावली आहे. राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. मात्र ही रूग्णसंख्या वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना लॉकडाऊनची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे नियोजनपद्धतीने हे लॅाकडाऊन 15 दिवसांसाठी लावले जाणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील उद्योग धंद्यांवर लॅाकडाऊनचा परिणाम होणार असल्याने भाजपाने लॉक डाऊनला विरोध दर्शविला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नाईट कर्फ्यु करण्यात आलाय. लॉकडाउनचा निर्णय करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र अद्यापही संभ्रमात आहेत. लॉकडाउन जाहीर करण्यासाठी प्रशासनातील विविध विभागाची मते ते आजमावत आहेत. विरोधी पक्ष भाजपाचा लॉकडाऊन करण्याला मात्र विरोध आहे.

लॉकडाऊन! ठाकरे संभ्रमात! भाजपाचा विरोध!
लॉकडाऊन हा पर्याय नाही. आता जर लॉकडाऊन केला तर तुम्ही एक रुपयाचे पॅकेज देणार नाही. एक वर्ष लोक कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यासाठी पूर्वी जसा राजा कपडे बदलून वस्त्या वस्त्या फिरायचा तसे फिरावे लागेल. कारण तुम्ही मुख्यमंत्री असल्यामुळे तुमच्यासोबत ताफा असणार. त्यामुळे तुमच्याशी कोणीही मनमोकळेपणाने बोलणार नाही. तुम्ही झोपड्यांमध्ये जा. त्याठिकाणी फिरा. तेथील अनेक नागरिक काहीतरी दिवसभर काम करुन मग घरी परतल्यानंतर जेवतात. तर त्यांना तुम्ही काहीही दिल नाही. त्यात नुकतेच दोन महिने चांगले गेले आणि आता तुम्ही लॉकडाऊन करता.
- चंद्रकांत पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष.

अजित पवार विसरलेत की ते नुसते उपमुख्यमंत्री नाही तर अर्थमंत्री सुद्धा आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे की, लॉकडाऊन हे महाराष्ट्राला परवडणार नाही. कोरोना हाताळण्याची सिस्टम दर्जेदार करा पण नोकरी धंद्यांचे नुकसान होता कामा नये. महाराष्ट्राची वाट लावू नका, 2020मध्ये जो लॅाकडाऊन करण्यात आला होता त्याचा राज्यातील उद्योगांना मोठा फटका बसला होता. भारताची अर्थव्यवस्था नकारात्मक आकड्यात गेली होती. नुकतीच अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येत असताना महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे सामान्य उद्योजकांना याचा फटका पुन्हा बसणार आहे.
-  निलेश राणे, भाजपा नेते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here