कोरोनामुळे मृत्यू पावलेलेल्या कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 लाखाची मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 10, 2021

कोरोनामुळे मृत्यू पावलेलेल्या कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 लाखाची मदत

 कोरोनामुळे मृत्यू पावलेलेल्या कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 लाखाची मदत


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असताना मनपाच्या चार कर्मचारी पाणी पुरवठा विभागातील एक आरोग्य विभागातील दोन व मलेरिया विभागातील एक अशा एकूण चार कर्मचार्‍यांचा कोरोना संसर्ग विषाणूमुळे दुदैवी मृत्यू झाला. मनपा त्यांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांच्या कुटुंबातील वारसांना महानगरपालिका कर्मचारी कल्याण निधीतून प्रत्येकी एक लाख रूपयाची आर्थिक मदत करण्यात आली असल्याचे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
महापौर याप्रसंगी महणाले की कोरोना संसर्ग विषाणूने  संपूर्ण देशामध्ये थैमान घातला असल्याने आपल्या सरकारने संपूर्ण देश लॉकडॉऊन केला. या लॉकडॉऊनच्या काळामध्ये अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले कोरोना विषाणू हा संसर्ग असल्यामुळे एक व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना कोरोना संसर्ग होण्याची भिती मोठया प्रमाणात होती. तरी सुध्दा अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी दैनंदिन कामकाजामध्ये स्वच्छता, पाणी पुरवठा, दिवाबत्ती लावण्याचे काम चोखपणे पार पाडले.
यावेळी उपायुक्त डॉ.श्री.प्रदिप पठारे म्हणाले की, कर्मचारी कल्याण निधी मार्फत वर्षभर कर्मचार्‍यांचे आर्थिक मदत करण्याचे काम केले जात आहे.तसेच कर्मचार्‍यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.  कोरोना संसर्गाच्या काळामध्ये मनपाच्या कर्मचार्‍यांचा दुदैवी मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:ख कोळसले. कर्मचारी कल्याण निधी मार्फत छोटीशी मदत करण्याचे काम केले असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी आयुक्त मा.श्री.शंकर गोरे, उपायुक्त तथा कर्मचारी  कल्याण  निधी समितीचे अध्यक्ष डॉ.श्री.प्रदिप पठारे, सभागृह नेते मा.श्री.मनोज दुलम, ज्येष्ठ नगरसेवक मा.श्री.रामदास आंधळे, शहर जिल्हाध्यक्ष मा.श्री.महेंद्रभैय्या गंधे, माजी नगरसेवक मा.श्री.निखील वारे, कामगार युनियनचे अध्यक्ष मा.श्री.अनंत लोखंडे, श्री.आनंद वायकर,  कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.बाबासाहेब मुदगल, सदस्य श्री.राजेश लयचेट्टी, श्री.शेखर देशपांडे, श्री.विजय बोधे, श्री.बलराज गायकवाड, श्री.गुलाब गाडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment