छत्रपतींचा आदर्श हा समाजाला प्रेरणादायी व दिशादर्शक : जाधव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 31, 2021

छत्रपतींचा आदर्श हा समाजाला प्रेरणादायी व दिशादर्शक : जाधव

 छत्रपतींचा आदर्श हा समाजाला प्रेरणादायी व दिशादर्शक : जाधव


अहमदनगर-
छत्रपतींचा आदर्श हा समाजाला प्रेरणादायी व दिशादर्शक आहे. युवकांनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाज प्रबोधन करावे. जात, धर्म व पंत न मानता त्यांनी सर्वांना न्याय देवून समता व बंधूत्व प्रस्तापित केले. रयतेला केंद्रबिंदू मानून त्यांनी आपाल राज्य कारभार केला. छत्रपतीची कामे समाजाला प्रेरणादायी आहे. त्यांची आठवण आपण सर्वांनी देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजाच्या जंयतीनिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने व दिल्लीगेट तरून मित्रमंडळाच्या वतीने सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई येथील जुही चौपाटी येथे साकारलेला बाजी पासलकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा असलेला देखावा, दिल्लीगेट येथे साकारण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हे शिस्तबद्ध, लष्कर, व सुसघंटित प्रशासकिय बळावर त्यांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रगतशील राज्य उभे केले. आजही छत्रपतीनी आमलात आणलेल्या विविध योजना आपण राबवत आहोत. शिवरायांनी शेतीविषयक धोरण अवलंबून त्या आमलात आणल्यामुळे शिवकाळात अनेकदा दुष्काळ पडल्यानंतरही शेतकर्‍यांनी कधीही आत्महत्या केली नाही शेतकर्‍यांचे प्रश्न समजावून घेऊन ताबडतोब सोडविण्याचे काम केले याचबरोबर सर्वसमाजाला एकत्रित करून रयतेचे राज्य निर्माण करून कारभार केला असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांनी केले.
याप्रसंगी गिरीश जाधव अजय भोयर, बबन गोसके, सागर सावेकर, इजि. विनोद काकडे, बाळासाहेब सांगोळे, नितीन पावले, सुनिल सुडके, अतुल पिंपरकर, तुळशीदास नगरे, मदार मुळे, रोहन सांगोळे, बबलू झिकरे, सलिम शेख, संकेत गांधी, सचिन पावले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment