जीवनात आनंदी राहण्यासाठी स्विकार भाव आवश्यक : कुलकर्णी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 8, 2021

जीवनात आनंदी राहण्यासाठी स्विकार भाव आवश्यक : कुलकर्णी

 जीवनात आनंदी राहण्यासाठी स्विकार भाव आवश्यक : कुलकर्णी

महिलांनी महिलांसाठी साकारलेल्या ‘जिव्हाळा’ ग्रुपचे शानदार सोहळ्यात उद्घाटन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये महिलांच्या सर्वांगीण उन्नतीचे ध्येय समोर ठेवून महिलांनीच एकत्र येत जिव्हाळा ग्रुपची मुहूर्तमेढ रोवली आहे. मुंबई येथील अल्पना कुलकर्णी यांच्या हस्ते शानदार समारंभात या ग्रुपचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहर व जिल्ह्यातील वकीली, शिक्षण, वैद्यकीय, सामाजिक, सी.ए., गृहिणी अशा विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना अल्पना कुलकर्णी म्हणाल्या की, जीवनात आनंदी राहण्यासाठी स्वयं की खोज आवश्यक आहे. मनात स्वतः बद्दल, इतरांबद्दल स्विकार भाव निर्माण झाला पाहिजे.एकदा स्विकार करायला शिकलो की अनेक गोष्टींवर जय मिळवता येतो. सुपर वुमन होताना जे काम करू ते अति उत्तम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जिव्हाळा ग्रुपची निर्मिती महिलांना आनंदी जीवनाचे नवीन द्वार खुले करणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिव्हाळा ग्रुपबाबत अल्पना कासवा यांनी सांगितले की, आजच्या जीवनात प्रत्येकीला एका वेळी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अनेक भूमिका बजवाव्या लागतात. अशा वेळी स्त्री शक्तीचा जागर खूप गरजेचा आहे. महिलांना आत्मसन्मान मिळावा, खुले अवकाश मिळावे, व्यवसाय भरारी घेण्याचे बळ मिळावे, त्यांनी विविध माध्यमातून व्यक्त व्हावे, असे उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. यात नगर शहर व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील महिलांना समावून घेण्यात आले आहे. येत्या काळात महिलांना बळ देणारे, जीवनाचा निखळ आनंद देणारे उपक्रम, विविध कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे. जिव्हाळा हे आपुलकीच्या नात्याचे बिजारोपण आहे. त्याचे वटवृक्षात रूपांतर करण्याचा प्रयत्न राहील. जिव्हाळा परिवारातील प्रत्येक महिलेला अभिमान वाटेल अशी वाटचाल करू, अशी ग्वाही कासवा यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.ए.आयुषी कासवा यांनी केले. अर्चना सोळंकी यांनी आभार मानले. उद्घाटनप्रसंगी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी धमाल आणली. जिव्हाळा ग्रुपच्या निर्मितीत अर्चना बाफना, सुवर्णा डागा, सविता काळे, स्वाती वाघ, वीणा जगताप, प्रियंका पिसुटे, सीमा शेटिया आदिंनी योगदान दिले आहे. या देवी सर्व भूतेषु, शक्ती रूपेन संस्थित:, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः, या संस्कृत श्लोकाने कार्यक्रमाचा शुभारंभ व सांगता झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here