शहर विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी वीरेंद्र ठोंबरे यांची निवड तर प्रभारी पदी अनिस चुडीवाल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 19, 2021

शहर विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी वीरेंद्र ठोंबरे यांची निवड तर प्रभारी पदी अनिस चुडीवाल

 शहर विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी वीरेंद्र ठोंबरे यांची निवड तर प्रभारी पदी अनिस चुडीवाल


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. अहमदनगर शहर विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी वीरेंद्र ठोंबरे यांची निवड विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष आकाश क्षीरसागर यांनी जाहीर केली आहे.
क्षीरसागर यांनी ठोंबरे यांना निवडीचे पत्र दिले आहे. यापूर्वी चिरंजीव गाढवे हे अध्यक्ष पदाचा पदभार पाहत होते. त्यांना जवळपास चार महिने पदावर काम करण्याची संधी मिळाली. विद्यार्थी संघटनेत फेरबदल सुरू असून नुकतीच नगर तालुका अध्यक्ष पदी सुजित जगताप यांची वर्णी लागली होती. त्यानंतर आता शहरात फेरबदल करण्यात आला आहे.
वीरेंद्र ठोंबरे हे गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग नोंदवत नेतृत्व केले आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांचे त्यांनी आजवर यशस्वी आयोजन केले आहे. निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना ठोंबरे म्हणाले की, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे हे स्वतः विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करणारे नेते आहेत. त्यांच्याकडे विद्यार्थी विकासाचे व्हिजन आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरामधील सर्व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी काँग्रेसची संघटना बळकट केली जाईल. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अनिस चुडीवाल यांची अहमदनगर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या प्रभारी पदी निवड केली आहे. चुडीवाल हे शहर जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी मध्ये विशेष निमंत्रित आहेत. काळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून नवनियुक्त अध्यक्ष, नव्याने निवडण्यात येणार्या कार्यकारीणीतील विद्यार्थी पदाधिकार्‍यांना सोबत घेत विद्यार्थी हिताचे कार्यक्रम हाती घेण्यात येतील, असे चुडीवाल यांनी नियुक्ती नंतर सांगितले आहे. वीरेंद्र ठोंबरे, अनिस चुडिवाल यांचे निवडीबद्दल महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह माजी महापौर दीप चव्हाण, ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे, आकाश क्षिरसागर, प्रवीणभैय्या गीते पाटील, स्मितल वाबळे, राहुल उगले, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, सोमेश्वर दिवटे, अ‍ॅड.अक्षय कुलट आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here