मजुरीचे पैसे न मिळाल्यास चूल पेटविने अवघड- अ‍ॅड सुधीर टोकेकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 10, 2021

मजुरीचे पैसे न मिळाल्यास चूल पेटविने अवघड- अ‍ॅड सुधीर टोकेकर

 मजुरीचे पैसे न मिळाल्यास चूल पेटविने अवघड- अ‍ॅड सुधीर टोकेकर

विडी कामगारांची कंपनीच्या प्रवेशद्वारावर निदर्शने...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मजुरी किमान वेतन कायदा 1963 नुसार वेतन वेळेवर देणे ही मालकाची जबाबदारी आहे. सध्या महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त असताना विडी कामगारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. वेळेवर मजुरीचे पैसे हातात न पडल्यास घरात चुल पेटवणे देखील अवघड झाले आहे. कंपनी मालकांनी व विडी कामगारांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेऊन वेळेवर 5 तारखेच्या अगोदर मजुरी देणे आवश्यक असल्याचे आयटकचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड.सुधीर टोकेकर यांनी म्हंटले आहे.

महागाईने जगणे कठिण झाले असताना वेळेवर मजुरी मिळत नसल्याने लालबावटा विडी कामगार युनियन आयटक व इंटक विडी कामगार संघटना वतीने श्रमिकनगर व बागडपट्टी येथील विडी कंपनीच्या कार्यालयासमोर विडी कामगारांनी आंदोलन केले. संतप्त विडी कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी ते बोलत होते
कॉ. अँड टोकेकर पुढे म्हणाले की भारती न्यालपेल्ली यांनी विडी कामगार महिला विडी वळण्याच्या मजुरीवर कुटुंब चालवत आहे. महिला दिन सर्वत्र साजरा होत असताना सर्व सामान्य श्रमिक महिलांच्या प्रश्नांची दखल घेतल्यास खर्या अर्थाने महिला दिन साजरा होणार आहे.
विडी कामगारांचे हातावर पोट असल्याने काम केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. विडी कामगार महिलांना 5 तारिख होऊन देखील अद्यापि हातात केलेल्या कामाची मजुरी न पडल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. विडी कामगार महिलांना उसनवारी करून कुटुंब चालवावे लागत आहे. यापुर्वी 15 दिवसाला मजुरी मिळत असल्याने कामगारांचे सोयीचे चालत होते. ही मजुरी महिन्याला करण्यात आल्याने विडी कामगारांना कुटुंब चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तर ही महिन्याची मजुरी देखील वेळेवर मिळत नसल्याने विडी कामगारांमध्ये संतप्त भावना असून, 5 तारखेच्या अगोदर मजुरी मिळण्याची मागणी ही याप्रसंगी विडी कामगार संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. विडी कंपनीचे व्यवस्थापक लक्ष्मण माळी यांनी आंदोलनाची तातडीने दखल घेत बुधवार दि.10 मार्च पासून विडी कामगारांची मजुरी वाटप करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात आयटकच्या उपाध्यक्षा कॉ.भारती न्यालपेल्ली, शारदा बोगा, लक्ष्मी कोटा, कमल दोंता, इंटकच्या कविता मच्चा, सरोजनी दिकोंडा, निर्मला न्यालपेल्ली, संगीता कोंडा, सगुणा श्रीमल, शोभा पासकंठी, ईश्वरी सुंकी, लिलाबाई भारताल, रेणुका अंकम, भाग्यलक्ष्मी गड्डम, रेखा सग्गम, शमीम शेख आदींसह विडी कामगार महिला सहभागी झाल्या होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here