या कारणामुळे मेहरबाबा ट्रस्टच्या कामगारांचा सत्याग्रह मागे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 24, 2021

या कारणामुळे मेहरबाबा ट्रस्टच्या कामगारांचा सत्याग्रह मागे

 या कारणामुळे मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांचा सत्याग्रह मागे

मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची अखेर पगारवाढ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अवतार मेहेरबाबा ट्रस्टने तडजोड करुन कामगारांना पगारवाढ दिल्याने लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन दुसर्या दिवशी मंगळवारी (दि.23 मार्च) मागे घेण्यात आले. आमदार निलेश लंके यांनी आंदोलकांना ऊसाचा रस पाजून उपोषण सोडवले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त मेहेरनाथ कलचुरी, रमेश जंगले व फल्लू मिस्त्री उपस्थित होते.
अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत मार्च 2020 मध्ये संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची मागणी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने लावून धरली होती. यासाठी संघटनेच्या वतीने मागील पाच ते सहा महिन्यापासून पाठपुरावा सुरु होता. यासंदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात प्रकरण चर्चेने सोडविण्यासाठी सात ते आठ तारखा झाल्या. तोडगा निघत नसल्याने कामगारांनी शेवटी सोमवार पासून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर लालबावटाचे जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, युनिट अध्यक्ष सतीश पवार व भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनास जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, नगर पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, शरद झोडगे, जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे, दत्ता जाधव, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिक बारसे, अरणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव शेळके यांनी पाठिंबा दिला. यावेळी लाल बावटा विडी कामगार युनियन उपाध्यक्षा भारती न्यालपेल्ली, संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनिता जावळे, प्रविण भिंगारदिवे आदींसह कामगार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here