घुले, जगताप, शेळके ही नावे आघाडीवर? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 3, 2021

घुले, जगताप, शेळके ही नावे आघाडीवर?

 घुले, जगताप, शेळके ही नावे आघाडीवर?

जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत आज पवार व थोरातांची चर्चा..
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणार्‍या अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड येत्या सहा तारखेला होत आहे पण अध्यक्ष ची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत सहकार क्षेत्रात उत्सुकता वाढलेली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा विषय अजेंड्यावर घेतला आहे. बुधवारी या विषयावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे दरम्यान बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणार हे जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे नाव सर्वात जास्त आघाडीवर आहे तर त्याखालोखाल श्रीगोंदे ची माजी आमदार राहुल जगताप यांचेही नाव चर्चेत आहे . दरम्यानच्या दोघांव्यतिरिक्त अजून तिसरे नाव चर्चेत उदय शेळके यांची नावे चर्चेत आहे. तरुण चेहर्‍याला संधी द्यावी यावर अजित पवार व बाळासाहेब थोरात यांची एकमत असल्याचे कळते मात्र ते कोणाच्या पारड्यात सहमतीची वजन टाकणार आहे आज की उद्या स्पष्ट होणार आहे.
माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्याबाबत झाले तर त्यांना सहकार क्षेत्रातील चांगला दाडंगा अनुभव आहे त्यांनी या आधी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद चांगले सांभाळले आहे. तसेच ते याआधी काही संचालक म्हणूनही निवडून गेलेले आहे. त्या दरम्यान त्यांनी उत्कृष्ट कामही केले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. इच्छुक नेत्यांनी यासाठी दोन दिवसापासून फिल्डिंग लावली आहे सध्या मुंबईतून सगळे सूत्र हलवली जात आहे. विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्याने पवार व थोरात हे दोन्ही नेते व्यस्त आहे मात्र त्यांनी जिल्हा बँकेचे बाबत आज एकत्रित चर्चेचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here