शहाजीराजे यांनी स्वतंत्र राज्यासाठी प्रयत्न केले ः शफकत सय्यद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 19, 2021

शहाजीराजे यांनी स्वतंत्र राज्यासाठी प्रयत्न केले ः शफकत सय्यद

 शहाजीराजे यांनी स्वतंत्र राज्यासाठी प्रयत्न केले ः शफकत सय्यद

मखदूम सोसायटीतर्फे छत्रपती शहाजी महाराज यांना अभिवादन


गरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः 17 व्या शतकाच्या सुरुवातीला दख्खनमध्ये शहाजी महाराज यांना संघर्ष करावा लागला. मग ती अदिलशाही असो की निजामशाही किंवा मोगलांशी ते सतत लढत राहिले.  शहाजी राजे एक महत्वकांक्षी मराठा सरदार होते. दुसर्याची चाकरी करण्याचा त्यांचा मानस नव्हता. ते स्वतंत्र विचाराचे होते. त्यांना मराठ्यांचे स्वतंत्र्य राज्य असावे, असे वाटत होते. पण बलाढ्य मोगल असतांना व दक्षिणेत आदिलशाही व निजामशाही प्रबळ असतांना त्यांना सुरुवातीला निजामशाहीत राहून त्यांनी आपल्या पराक्रमामुळे तेथे आपला दबदबा निर्माण केला. निजामशाहीची मोगल व आदिलशाह या दोन सत्तांच्या विरोधात भातोडी येथे इ.स.1624 मध्ये झालेल्या लढाईत शहाजी राजे यांनी मोठा पराक्रम केला. या लढाईचे नेतृत्व जरी मलिकअंबर यांनी केले असले तरी युद्धामध्ये पराक्रम हा भोसले बंधूंनी केला, असे प्रतिपादन मुस्कान सोशल फौंडेशनचे अध्यक्ष शफकत सय्यद यांनी केले.
मखदुम सोसायटीच्यावतीने छत्रपती शहाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वस्तू संग्रहालयातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी आबीद दुलेखान, शफकत सय्यद, शहानवाज तांबोळी, भरत सहसानी, नईम सरदार, किल्ले संवर्धक ठाकूरदास परदेशी, रुग्णमित्र नादीर खान, नाणी संग्रहक पंकज मेहेरे आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना शफकत सय्यद म्हणाले, राजकीय मुत्सद्दी असलेल्या शहाजीराजे यांनी स्वातंत्र्य राज्यासाठी केलेले अनेक प्रयत्न, बेंगलोर येथून चालविलेले स्वतंत्र्य राज्य यातून शहाजी महाराजांची भुमिका स्पष्ट दिसून येते. तसेच त्यांची काही खुर्दखते, इनामपत्रे आणि त्यांनी केलेले न्याय-निवाडे हे स्वराज्य स्थापनेत त्यांची भुमिकाही खूप महत्वाची होती हेही आपल्यासमोर येते. शिवबांना बेंगलोरवरुन निरोप देत असतांना शहाजी महाराजांनी दिलेली स्वतंत्र्य राजमुद्रा, ध्वज आणि सोबत दिलेली विश्वासू माणसे पाहता याप्रसंगावरुन शहाजी महाराज किती दूरदर्शी होते आणि त्यांचा छत्रपती महाराज यांच्यावरील विश्वास व भविष्यात स्थापन होणार्या स्वराज्यामधील आस्था दिसून येते.
सूत्रसंचालन मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी केले. प्रास्तविक नईम सरदार यांनी केले तर आभार ठाकूरदास परदेशी यांनी मानले.

No comments:

Post a Comment