सुरभी हॉस्पिटलने समाजात वेगळा ठसा उमटविला - ना. बाळासाहेब थोरात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 29, 2021

सुरभी हॉस्पिटलने समाजात वेगळा ठसा उमटविला - ना. बाळासाहेब थोरात

 सुरभी हॉस्पिटलने समाजात वेगळा  ठसा उमटविला - ना. बाळासाहेब थोरात


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कुठलीही संस्था चालवायची असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे कौशल्य व कुशलता असणे गरजेचे असते. सुरभी हॉस्पिटलची उभारणीही अशाच कौशल्य व कुशलता असलेल्या विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी एकत्र येऊन केली आहे. हॉस्पिटलने अत्याधुनिक व विश्वसनीय सेवा देऊन अल्पावधीतच वैद्यकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवता नावलौकिक मिळविला आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केले.
येथील नगर-औरंगाबाद रोडवरील सुरभी हॉस्पिटलला ना. थोरात यांनी भेट दिली. यावेळी त्यांना मेडिकल डायरेक्टर डॉ. राकेश गांधी उपलब्ध वैद्यकीय सेवा सुविधांबद्दल माहिती दिली. याप्रसंगी डॉ. आशिष भंडारी, डॉ. अमित पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, हनीफ शेख, जहागिरदार आदी उपस्थित होते.
ना. थोरात म्हणाले की, पूर्वीपेक्षा आज परिस्थिती बदलली आहे. मोठ्या शहरांच्या तुलनेत नगरमध्ये रुग्णांना चांगल्या व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्या आहेत. ‘सुरभी’मुळे जगभरातील उच्च वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा नगरमध्ये मिळत आहे, असे ते म्हणाले. डॉ. राकेश गांधी म्हणाले की, हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर, प्लास्टिक सर्जरी, वंध्यत्व निवारण, दमा, मधुमेह, हृदयरोग, स्त्री रोग, मुळव्याध, भगंदर, बालआरोग्य, लिव्हर व पोटविकार आदींसह सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. विविध शिबिरांचे आयोजन हॉस्पिटलने केले असून, त्याचा मोठ्या संख्येने रुग्णांनी लाभ घेतला आहे, असे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here