जि.प च्या सर्वसाधारण सभेला कोरोनामुळे ब्रेक.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 10, 2021

जि.प च्या सर्वसाधारण सभेला कोरोनामुळे ब्रेक..

 जि.प च्या सर्वसाधारण सभेला कोरोनामुळे ब्रेक..

जि.प सदस्यांचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः झेडपीच्या सर्वसाधारण सभेला करोना नियमांचे पालन करून 150 लोकांच्या उपस्थितीला परवागी मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यावर काय निर्णय दतात याकडे जिल्हा परिषदेच्या वर्तुळाचे लक्ष आहे.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यामुळे प्रत्यक्ष सभा होणे शक्य नव्हते. यामुळे हा प्रश्न अद्यापही कायम आहे. झेडपीच्या या सभा प्रत्यक्षात व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषद सदस्य आक्रमक आणि आग्रही आहेत.
गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषदेच्या प्रत्यक्षात होणार्‍या सर्वसाधारण सभेला ब्रेक लागलेला आहे. या सभा प्रत्यक्षात व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषद सदस्य आक्रमक आणि आग्रही आहेत. ऑनलाईन - ऑलाईनच्या गोंधळात अडकलेली हि सभा सदस्यांच्या उपस्थितीत पार पडावी यासाठी आता जिल्हाधिकार्‍यांना साकडे घालण्यात आले आहे. सर्वसाधारण सभा ऑनलाईन होत असल्याने त्याचा उपयोग सदस्यांना होत नाही. अनेक तांत्रिक समस्यांमुळे सदस्यांचा ऑनलाईन सभेला विरोध होता. यामुळे जिल्हा परिषदेचे अनेक सदस्य आक्रमकपणे प्रत्यक्षात होणार्या सभेची मागणी करत आहे. वास्तवात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षा या पिठासीन अधिकारी असतात. त्यांच्या परवानगीशिवाय सभेला उपस्थित राहणे सोडा, सभेत बोलताही येत नाही. मात्र, वाढत्या करोना संसर्गामुळे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी एका ठिकाणी 50 पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास मज्जाव केला आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन ऑनलाईन सभा घेत आहे. मात्र, यामुळे काही सदस्य प्रशासनावर त्याचा राग काढत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत पत्र पाठवून जिल्हाधिकारी यांच्याकडे मार्गदर्शन मागविले आहे. यात सर्वसाधारण सभेसाठी 150 लोकांच्या उपस्थितीबाबत परवानगी मागितली आहे.

No comments:

Post a Comment