ठेकेदार कंपनीला वारंवार मुदतवाढ का?- मनोज कोतकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 5, 2021

ठेकेदार कंपनीला वारंवार मुदतवाढ का?- मनोज कोतकर

 ठेकेदार कंपनीला वारंवार मुदतवाढ का?- मनोज कोतकर

शहरात सर्वत्र एक महिन्यात एलईडी पथदिवे बसवा अन्यथा आंदोलन करू


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरामध्ये सर्वत्र पथदिवे बंद असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. अनेक दिवसापासून राष्ट्रीय व राज्य महामार्गावरीलही पथदिवे बंद आहे. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहे. यासाठी पथदिवे सुरू करण्यासाठी आयुक्त दालनासमोर उपोषण केल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये एलईडी पथदिवे बसवण्याच्या निविदा प्रक्रिया जलद गतीने सुरू करण्यात आल्या परंतु आजपर्यंत एलईडी पथदिवे बसवण्याच्या कामाला सुरूवात झाली नसल्यामुळे आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन चर्चा केली. येत्या एक महिन्यात संपूर्ण शहरामध्ये एलईडी पथदिवे बसवण्याच्या कामाला सुरूवात करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी दिली.
नगर शहरातील एलईडी पथदिवे बसवण्याच्या कामाला लवकरात लवकर सुरूवात करावी अशी मागणी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे करतांना मनोज कोतकर, सभागृह नेते मनोज दुलम आणि संजय ढोणे आदी उपस्थित होते. महापालिकेच्यावतीने शहरामध्ये एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या असून 16 फेब्रुवारी 2021 रोजी दोन्ही कंपन्यांना शहरातील साईट दाखविण्यात आली. दि. 17 रोजी दोन्ही कंपन्यांना पालिकेच्यावतीने पत्र देऊन पथदिवे बसविण्याचे आदेश दिले.
त्यानंतर क्लुक्स ट्युबींग्स एलईडी कंपनी कुष्ठधाम रोडवर प्रायोगिक तत्त्वावर पथदिवे बसविण्याचे काम केल्यानंतर गर्व्हन्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्यावतीने या पथदिव्यांची तपासणी केल्यानंतर महापालिकेच्या पथदिव्यापेक्षा उत्कृष्ट दर्जाचे असल्याचे पत्र पालिका प्रशासनास दिले. परंतु दुसरी एजन्सी ईस्मार्ट एनर्जी सोल्यूशन्स प्रा. लि. यांनी आजतागायत मुदत संपूनही पथदिवे बसविले नाही. परंतु पालिका प्रशासन त्यास पुन्हा वारंवार मुदतवाढ का देतात. गेल्या 15 दिवसात एकही पथदिवे बसविण्यात न आलेल्या कंपनीला प्रशासन पाठीशी का घालत आहे? शहर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अंधारात असतानाही ईस्मार्ट एनर्जी या कंपनीला वारंवार मुदतवाढ का मिळत आहे, असा सवाल सभापती मनोज कोतकर यांनी उपस्थित केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here