मुकुंदनगरच्या पाणी टाकीच्या स्वच्छतेचे काम महापालिकेकडून सुरु - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 19, 2021

मुकुंदनगरच्या पाणी टाकीच्या स्वच्छतेचे काम महापालिकेकडून सुरु

 मुकुंदनगरच्या पाणी टाकीच्या स्वच्छतेचे काम महापालिकेकडून सुरु

नगरसेवक आसिफ सुलतान यांच्या आंदोलनाची दखल


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरसेवक आसिफ सुलतान यांनी बुधवारी महापालिकेत आयुक्तांच्या दालनात केलेल्या आंदोलनाची दखल घेत आठ वर्षापुर्वी बांधण्यात आलेल्या मुकुंदनगरच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छतेचे काम महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. या कामाची पहाणी नगरसेवक आसिफ सुलतान, सामाजिक कार्यकर्ते फारुक शेख, मनपाचे इंजि. इमरान खान यांनी केली यावेळी मनपाचे कर्मचारी उपस्थित होते. फेज टू चे राहिलेले काम पुर्ण करुन पाण्याच्या टाकीतून मुकुंदनगर भागातील नागरिकांना पाणी मिळणार असून, या भागातील अनेक वर्षांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.
मुकुंदनगर प्रभाग 3 मध्ये दोन ते चार दिवासाआड पाण्याचे वितरण होत असताना, या भागात वेळेवर नियमीत पाणीपुरवठा करण्यासह या भागातील स्वच्छता, ड्रेनेजलाईन, बंद पथदिव्यांचा प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली होती. महापालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील सदर प्रश्न सुटत नसल्याने नगरसेवक आसिफ सुलतान यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात झोपाकाढू आंदोलन करण्याचा प्रयत्न करुन, मनपाच्या अंदाजपत्रकीय सभेत आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन मनपा प्रशासनाने मुकुंदनगर येथील पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाऊले उचलली आहेत. आठ ते दहा दिवसात मुकुंदनगरचा पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. तसेच महापालिकेच्या वतीने सदर भागासाठी स्वच्छता कर्मचारी व घंटा गाड्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाला सुचना करणारे आमदार संग्राम जगताप, मनपा आयुक्त व पाणी पुरवठा विभाग प्रमुख यांचे नगरसेवक सुलतान यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment