नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार तर फळबागांसाठी 50 हजार नुकसान भरपाई देण्यात यावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 24, 2021

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार तर फळबागांसाठी 50 हजार नुकसान भरपाई देण्यात यावी

 नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार तर फळबागांसाठी 50 हजार नुकसान भरपाई देण्यात यावी

भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांची जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर जिल्ह्यात मागील तीन चार दिवसापासून सुरु असलेले अवकाळी पावसामुळे अनेक गावात  अतिवृष्टी व गारपीटमुळे अनेक शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत .
तसेच यापूर्वीचा कोरडा दुष्काळ व मागील वर्षीचा  अतिवृष्टी यातून शेतकरी कुठे सावरत असताना श्रम आणि पेसा पणाला लावून शेतकरींनी पीक जोमात आणले असताना गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे .यामध्ये गहू,हरभरा ,कांदे,मका,ऊस,टरबूज ,खरबूज ,तसेच आंबा ,संत्री ,द्राक्षे ,मोसंबी,चिंच  या फळबागांचे मोठ्या प्रमाणवर नुकसान झाले आहे शेतकरींना या आर्थिक हाणीतून सावरण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर मदत मिळने गरजेचे आहे ,मागील वर्षीची गारपिटीने नुकसान भरपाई अदयप शेतकरींना मिळाली नाही ,तीही नुकसान भरपाई लवकर देण्यात यावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
भाजपच्या वतीने नगर जिल्ह्यातील शेतकरींना अतिवृष्टी व गारपीटमुळे  नुकसानग्रस्त भरपाई देण्यात यावी याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी दिले .यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले ,प्रसाद ढोकरीकर ,कचरू चोथे ,बाळासाहेब महाडिक ,दिलीप भालसिंग ,र्भाजी सूळ ,आजिनाथ हजारे ,शामराव पिपळे आदी उपस्थित होते
 अरुण  मुढे पुढे म्हणाले कि नगर जिल्ह्यातील  अतिवृष्टी व गारपीटमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी यांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्याना रब्बी हंगामातील पिके व भाजीपाला यांचे नुकसानभरपाई करीता हेक्टरी 25 हजार रुपये तर फळबागांच्या नुकसानीसाठी  हेक्टरी 50 हजार रुपये सरसकट अनुदान शासनाने द्यावे जेणे करून शेतकरी या अडचणीतून सावरण्यास मदत होईल
माजी आमदार शिवाजीराव कर्डीले म्हणाले कि राज्यात अवकाळी पाऊस होऊन तीन चार दिवस झाले तरी सरकारने पंचनामे करण्याचे कोणतेही आदेश दिले नाही .सरकारचे सर्व लक्ष संजय राठोड ,अनिल देशमुख ,वाजे या प्रकारणाच्या माध्यमातून थेट दिली पासून ते मुबई पर्यंत बेठकाचे सत्र  सुरु आहे पण शेतकरी यांचे कडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही असे त्यांनी सांगितले
येत्या आठ दिवसात शेतकरींना त्वरित नुकसानभरपाई देणेबाबत कारवाही करावी अन्यथा भाजपच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असे मुंढे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment