वाल्मिकी समाजाचा इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून युवकांपुढे येणार -दीप चव्हाण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 24, 2021

वाल्मिकी समाजाचा इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून युवकांपुढे येणार -दीप चव्हाण

 वाल्मिकी समाजाचा इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून युवकांपुढे येणार -दीप चव्हाण

वाल्मिकी समाज उत्पत्ती स्थिती आणि परिवर्तन या पुस्तकाचे प्रकाशन

अहमदनगर - शहरातील वीर गोगादेव मंदिरात वाल्मिकी समाज उत्पत्ती स्थिती आणि परिवर्तन या पुस्तकाचे प्रकाशन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रभाकर मांडे लिखीत या पुस्तकात भारतातील वाल्मिकी समाजाचे निरीक्षण व अनेक ऐतिहासिक घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तक प्रकाशनप्रसंगी लेखक प्रभाकर मांडे, सारडा महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व संशोधण केंद्राच्या समन्वयक प्रा.डॉ. ज्योती बीडलान, गोदावरी प्रकाशनच्या संचालिका वृषाली मांडे, प्रा. सुनीता थोरात आदी उपस्थित होते.
या पुस्तकात वाल्मिकी समाजाचं उदय, या समाजातील जाती, जमाती समावेश व विकास, आराध्य दैवत गोगादेव, समाजाची धार्मिक श्रद्धा याबाबत सविस्तर विचार मांडण्यात आले आहे. महर्षी वाल्मिकी ऋषी पासून सन 1857 चा स्वतंत्र लढा यामध्ये अनुसूचित जाती, जमाती म्हणून सहभागाचा अभ्यास आहे. दिल्ली येथील अंतर राष्ट्रीय म्युझिअम ऑफ टॉयलेट, भंगी मुक्त चळवळ व आजच्या आधुनिक काळात समाजात होत असलेले बदल व विकास, भारतीय समाज व्यवस्थेत त्यांचे स्थान याबाबत लेखक मांडे यांनी सविस्तर मांडणी केली आहे. पुस्तक प्रकाशनप्रसंगी दीप चव्हाण म्हणाले की, या पुस्तकातून वाल्मिकी समाजाचा इतिहास युवकांपुढे येणार आहे. आजपर्यंत असा प्रयत्न कधीही झाला नाही. समाजाचा श्रम, संस्कृती व उद्याचा अभ्यास यामध्ये मांडण्यात आला असल्याने हे पुस्तक युवकांना चालना देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा.डॉ. ज्योती बीडलान म्हणाल्या की, हे पुस्तक सामाजिक ऐक्य व विकासासाठी कायम मार्गदर्शक राहणार आहे. समाजातील युवक-युवतींना आपल्या पुर्वजांचा इतिहास ज्ञात होणार आहे. वंचित घटक असलेल्या वाल्मिकी समाजातील लोक समूहाला हे पुस्तक नवक्षेत्रात विकास, मूल्य व संस्काराला चालना देण्यासाठी बहू उपयोगी ठरणार असल्याचे सांगितले. वृषाली मांडे यांनी या पुस्तकाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.प्रमोद तांबे यांनी केले. आभार प्रा. विलास नाबदे यांनी मानले. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here