ओंकार भालसिंग हत्याप्रकरणातील, फरार मोक्का आरोपी सुप्यात सापडला! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 31, 2021

ओंकार भालसिंग हत्याप्रकरणातील, फरार मोक्का आरोपी सुप्यात सापडला!

 ओंकार भालसिंग हत्याप्रकरणातील, फरार मोक्का आरोपी सुप्यात सापडला!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 2020 मधील वाळकीतील ओंकार भालसिंग यांचे हत्येमधील तसेच मोक्का गुन्ह्यांमधील सहा महिन्यांपासून फरार असणारा आरोपी सुनील आडसरे वय 26 वर्षे रा भेंडाळा ता.आष्टी यास सुपा परीसरातील एका हॉस्पीटलमधुन मधून ताब्यात घेऊन नगर तालुका पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.
वाळकी गावातील चौकामध्ये विश्वजीत प्रतिष्ठानचे वतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचे वेळी विरोध करणारा ओंकार भालसिंग हा मोटारसायकलवरून घरी जात असताना त्यास समोरून चारचाकी वाहनाने धडक देऊन खाली पाडून लोखंडी पाइप व लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली होती. याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्यातील मुख्य आरोपी विश्वजीत रमेश कासार व त्याचे चार साथीदारांना यापूर्वी अटक केलेली आहे. गुन्ह्यातील आरोपी विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल असल्याने व आरोपी हे संघटितपणे गुन्हे करीत असल्याने सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा 1999 चे कलम 3 ही कलमे लावण्यात आली आहेत.
हा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी सुनील आडसरे हा फरार झालेला होता. पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक नेमून अआरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे श्री अनिल कटके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश इंगळे, मन्सूर सय्यद, नानेकर, संदीप बोडके, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, लक्ष्मण खोकले, कमलेश पाच फूट, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे यांचे पथक नेमून आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या.पथकातील अधिकारी व अंमलदार हे आरोपी सुनील आडसरे यांचा शोध घेत असताना अनिल कटके यांना माहिती मिळाली की, आरोपी सुनील आडसरे सुपा परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सुपा येथे जाऊन सुपा परिसरामध्ये असलेल्या हॉस्पिटलमध्ये आरोपींचा शोध घेतला असता निरामय हॉस्पिटल सुपा येथे आरोपी उपचारासाठी ऍडमिट असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आरोपीस ताब्यात घेऊन त्यास अहमदनगर येथे आणून त्याची सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे वैद्यकीय तपासणी करून त्यास नगर तालुका पो स्टे येथे हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही श्री अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर हे करीत आहेत.
आरोपी सुनील  आडसरे हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुद्ध नगर तालुका सुपा कोतवाली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, अजित पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर त्यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment