शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द करा ! - किरण काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 26, 2021

शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द करा ! - किरण काळे

 शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द करा ! - किरण काळे  

भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने

भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने
सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. तसेच केंद्र सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेले काळे कायदे रद्द करावेत अशी मागणी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आज केली.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शंभर दिवस उलटून गेले. सुमारे तीनशेहून अधिक शेतकर्‍यांचा उपोषणा दरम्यान दिल्ली सीमेवर मृत्यू झाला. पेट्रोल-डिझेलच्या किमती शंभरीला जाऊन पोहोचल्या. भविष्यात गॅसची किंमत देखील हजारापर्यंत पोहोचल्यास आश्चर्य वाटू नये. मात्र केंद्रातील भाजप सरकार यावर कोणतीही ठोस पावले उचलायला तयार नाही ही देशवासीयांसाठी अत्यंत खेदाची बाब आहे.
शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या वतीने आज भारत बंदच्या निमित्ताने जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यावेळी काळे बोलत होते. काँग्रेस पक्षाचा शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या बंदला ही त्यांनी पाठिंबा व्यक्त केला या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहोत. महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहरात केंद्राच्या विरोधात  लढा अधिक तीव्र करण्याची भूमिका भविष्यात घेतली जाईल, असा इशारा यावेळी काळे यांनी दिला आहे.नगर शहरात प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत बंदला पाठिंबा देण्यात आला.  
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष अज्जू शेख, महिला सेवादल अध्यक्ष कौसर खान, इंटक जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, अनंतराव गारदे, खालील सय्यद, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, निजाम जहागीरदार, गणेश आपरे, शंकर आव्हाड, नलिनी गायकवाड, जरीना पठाण, उषा भगत, सुमन कलापहाड, शबाना शेख, मंगल साठे, लता वाघमारे, भिंगार काँग्रेसचे कॅ. रिजवान शेख, सागर दळवी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment