यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा महत्त्वाचा वाटा ः कांबळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 8, 2021

यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा महत्त्वाचा वाटा ः कांबळे

 यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा महत्त्वाचा वाटा ः कांबळे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर
ः नगर तालुक्यातील दशमिगव्हण येथील ग्रामपंचायत मार्फत जागतिक महिला दिनानिमित्त गावातील सामाजिक, शैक्षणिक ,आरोग्य तसेच विविध क्षेत्रातील काम करणार्‍या महिलांचा सन्मान करून महिला दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ संगीता कांबळे या होत्या.
यावेळी बोलताना कांबळे म्हणाले की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत त्याच बरोबर ग्रामीण भागातील महिला आज मोठ्या उच्च पदावर आपल्या गावचे नाव उज्वल करत आहेत आम्हीही ग्रामपंचायत मार्फत यापुढे महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे मत व्यक्त केले.
यावेळी बाजार समितीचे संचालक उद्धव कांबळे उपसरपंच बाबासाहेब काळे, ग्रामसेवक एस शेळके, अनिता कांबळे ,सीमा कांबळे ,जयश्री काळे, राजश्री काळे, लताबाई काळे, अनिता काळे, सुवर्णा कांबळे, अर्चना काळे ,ज्योती चव्हाण ,आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment