जागतिक जल दिनानिमित्त तरडगाव ग्रामपंचायतीच्यावतीने वृक्षारोपण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 24, 2021

जागतिक जल दिनानिमित्त तरडगाव ग्रामपंचायतीच्यावतीने वृक्षारोपण

 जागतिक जल दिनानिमित्त तरडगाव ग्रामपंचायतीच्यावतीने वृक्षारोपण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः जागतिक जल दिनाचे औचित्य साधुन  तरडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्वच्छता करून पर्यावरणाचा समतोल रोखण्यासाठी गावचे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल बरबडे, गावचे सुपुत्र व मलठणचे ग्रामविकास अधिकारी अनिल केसकर, तरडगावच्या सरपंच सौ. संगीता वैजिनाथ केसकर, ग्रामपंचायत सदस्य पिंटू देवमुंडे, प्रा. श्रीराम काळे, सुनील  केसकर, वैजीनाथ केसकर, मोहन केसकर, भास्कर केसकर, रामदास देवमुंडे, सखाराम केसकर, आप्पासाहेब देवकाते,भागवत केसकर, बबन काळे, बबन हजारे, संदीप केसकर व ग्रामस्थांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी बोलतांना तरडगावच्या सरपंच सौ. संगिता वैजीनाथ केसकर म्हणाल्या की, गावातील स्वच्छतेचा प्रश्न  गायरान व तरडगाव गावठाण येथील काट्याची झाडे काढण्यात आळी. या झाडाने संपूर्ण मोकळी जागा व्यापली होती, त्यामुळे लोकांच्या रहदारीचा प्रश्न भेडसावत होता त्यामुळे आज गाव स्वच्छ दिसत आहे. हे सर्व सरपंच सौ संगीता वैजीनाथ केसकर यांच्या स्वखर्चातून केले जात आहे.      
पाणी, रस्ते या दळणवळणाच्या सुविधांसाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करून हे प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. जेणेकरून खूप दिवसापासून बंद पडलेले चार ही हातपंप दुरुस्त करण्यात आले. त्याचबरोबर केसकर वस्ती(तीणकुनी) येथील शासकीय विहिरीची पाईपलाईन पूर्ण करून आज पाणी चालू करून पाहिले आहे. तसेच थोड्या दिवसात माळवाडी येथील पाण्याच्या टाकीत पाणी टाकून तेथील वस्तीवरील लोकांना पाणी पुरवठा केला जाईल त्याचेही काम चालू आहे .
 त्याचबरोबर गावातील स्वच्छ व फिल्टर युक्त पाणी नागरिकांना देण्यासाठी तेही चालू करण्यात आले आहे त्या शुद्ध पाण्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा.
काळे मदनेवस्ती वरील पाण्याच्या टाकीचे आठ दिवसात काम चालू करून ते पूर्ण झाले की तेथील नागरिकाना पाणीपुरवठा केला जाईल.
तसेच गावातील अनेक रस्त्यांचे मुरमीकरणाचे काम पंधरा दिवसात चालू करून सर्व रस्त्यांचे कामे पूर्ण केली जातील. नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सोडविला जाईल. आज गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चार ते पाच दिवस झाले भेडसावत आहे. मागील सरपंचांच्या चुकीमुळे गावातील ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याचे विहीरीचे कोटेशन  तीन लाख रुपये थकीत आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकार्‍यांनी मोटरचे कोटेशन तोडले आहे, तरी ग्रामपंचायतला थोडीफार विज बिल भरून लाईट जोडणी करावी लागणार असल्याचे सरपंच संगीता केसकर यावेळी बोलताना म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here