ज्येष्ठ नागरिकांनी तात्काळ कोरोना लस घ्यावी ः गंधे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 22, 2021

ज्येष्ठ नागरिकांनी तात्काळ कोरोना लस घ्यावी ः गंधे

 ज्येष्ठ नागरिकांनी तात्काळ कोरोना लस घ्यावी ः गंधे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी व 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याची मोहीम हाती घेतली आहे. तरी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी तत्काळ कोरोना लस घेण्याचे आवाहन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक महेंद्रभैय्या गंधे यांनी केले.
सध्या शहरामध्ये कोरोना संसर्ग विषाणुचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. प्रत्येक नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून कोरोना संसर्ग विषाणूला हद्दपार करण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये 16 ठिकाणी लसीकरणाचे केंद्र आहे. यावेळी सावेडी आरोग्य केंद्रात जाऊन मी स्वतः कोरोना रोगप्रतिबंधक लस घेतली आहे तरी शहरातील नागरिकांनी लस घेऊन आपले व आपल्या कुटंबाचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment