सभापती अविनाश घुले शहराच्या विकासात मोलाची भर घालतील : ईश्वर बोरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 8, 2021

सभापती अविनाश घुले शहराच्या विकासात मोलाची भर घालतील : ईश्वर बोरा

 सभापती अविनाश घुले शहराच्या विकासात मोलाची भर घालतील : ईश्वर बोरा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहराचा विकास महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे. शहराचा चांगला विकास व्हावा यासाठी विकासात्मक दृष्टीकोन असलेले पदाधिकारी असणे आवश्यक आहे. मनपा स्थायी समितीचे नूतन सभापती पदावर  अविनाश घुले हे अनुभवी व्यक्तीमत्व विराजमान झाले आहेत. ते शहराच्या विकासात नक्कीच मोलाची भर घालतील. वंदेमातरम् युवा प्रतिष्ठानचे अविनाश घुले हे मार्गदर्शक आहेत. सभापतीपदी त्यांची झालेली निवड आम्हा सर्वांना अभिमानस्पद आहे, असे प्रतिपादन वंदेमातरम् युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी केले.
वंदेमातरम् युवा प्रतिष्ठानच्या वतीने मनपाचे नूतन स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांचे अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिक बोगावत, चिंटू खंडेलवाल, मनीष सोनग्रा, संदीप बायड, गणेश गोयल, आदित्य गांधी, संभव काथेड, संतोष ठाकूर, हेमंत रासने, संजय कांगला, प्यारेलाल खंडेलवाल, रवी किथानी, अजय ढोणे, भैय्या भांडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी सभापती अविनाश घुले म्हणाले, आ. संग्राम जगताप व राष्टवादी काँग्रेसच्या पदाधिकारींनी माझ्यावर विश्वास व्यक्त करत सभापती पदाची जवाबदारी दिली आहे. सर्व नागरिकांच्या सहकार्याने या पदाच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासात योगदान देणार आहे.

No comments:

Post a Comment