जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कमलाताई आपटे त्यांना ‘ऋषितुल्य व्यक्तिमत्व सन्मान’ पुरस्कार प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 8, 2021

जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कमलाताई आपटे त्यांना ‘ऋषितुल्य व्यक्तिमत्व सन्मान’ पुरस्कार प्रदान

 जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कमलाताई आपटे त्यांना ‘ऋषितुल्य व्यक्तिमत्व सन्मान’ पुरस्कार प्रदान

अहमदनगर - जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक व सामाजिक कार्यकर्त्या, अंध सेवा मंडळाच्या संस्थापिका श्रीमती कमलाताई आपटे या लवकरच 97 व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्यानिमित्त रोटरी क्लब अहमदनगर व मानकन्हैैय्या ट्रस्टच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करून त्यांना ‘ ऋषितुल्य व्यक्तिमत्व सन्मान ’ पुरस्कार  देवून सन्मानित करण्यात आले. अंध बंधुंसाठी कमलाताई आपटे यांच्या संकल्पनेतून डॉ.प्रकाश कांकरिया यांच्या प्रयत्नातून रोटरीने एमआयडीसी येथे उभारलेल्य रोटरी निवारा या घरकुल वसाहतीत हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.सुधा कांकरिया, रोटरी क्लबचे सचिव पुरुषोत्तम जाधव, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र आपटे, डॉ. दादासाहेब करंजुले, निलेश वैकर, प्रशांत बोगावत, माधव देशमुख, कौशिक कोठारी, महावीर मेहेर आदी रोटरी क्लबचे सदस्य, आपटे परीवार व अंध सेवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी कमलाताई आपटे यांनी सत्कारास उत्तर देतांना भावनाविश होत जुन्या घटना व आठवणींना थोडक्यात उजाळा दिला. त्या म्हणाला, नगरमध्ये कोणीही अंध बांधवांसाठी काम करत नव्हते. त्यावेळी डॉ. प्रकाश व डॉ.सुधा कांकरिया यांच्या मुळेच मी अंध बंधूभगिनींसाठीचे सेवाकार्य सुरु करू शकले. त्यातूनच हा अंध बंधावांसाठी रोटरी निवारा प्रकल्प उभा राहिला आहे. हे कार्य आजही चालू आहे. उत्तरोत्तर या कार्याची अजून प्रगती होवो व या ठिकाणी दुमजली इमारत उभी राहो या सदिच्छा देते. देवाने मला भरपूर शक्ती दिली आहे. त्यामुळे रोटरीच्या या कार्याला माझी जी मदत लागेल ते पूर्ण सहकार्य देण्यास मी तयार आहे. या कार्याला माझे भरपूर आशीर्वाद आहेत. जीवनात मी जे काही सामाजिक काम केले आहे ते सर्वांनी केलेल्या मदती मुळेच. आजच्या कार्यक्रमच्या माध्यमातून मी सर्वांचे आभार मनात आहे. आज हा माझा अलभ्य लाभ आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here