शहरातील उड्डाणपुलास डॉ. आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 26, 2021

शहरातील उड्डाणपुलास डॉ. आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी

 शहरातील उड्डाणपुलास डॉ. आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भिंगार येथील यशवंतनगर येथे भीम आर्मीच्या शाखेचा शुभारंभ राज्य संघटन महाप्रमुख दिपक भालेराव व जिल्हा प्रमुख तानसेन बिवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी भीम आर्मीचे शहराध्यक्ष सनी खरारे, शहर उपाध्यक्ष राहुल लखन, जिल्हा संघटक मनोज शिरसाठ, पापाभाई बिवाल, कार्याध्यक्षा मुन्नीताई चावरे, विनोद साबळे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश चक्रे, शाखा अध्यक्ष अक्षय चव्हाण, उपाध्यक्ष ऋतिक राठीया, कार्याध्यक्ष रोहित टाक, सचिव राजू भोसले, अर्जुन खरे, मिलिंद बचाटे, राहुल शेलार आदी उपस्थित होते.
राज्य संघटन महाप्रमुख दिपक भालेराव म्हणाले की, मागासवर्गीय दीन-दुबळ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भीम आर्मी संघटना कटिबध्द आहे. राजकारणापेक्षा अलिप्त राहून वंचितांना न्याय देण्यासाठी संघटनेचे कार्य सुरु असून, संपुर्ण महाराष्ट्रात भीम आर्मी कार्यरत असल्याचे सांगितले. शहराध्यक्ष सनी खरारे यांनी कोरोनाच्या संकटकाळात मागासवर्गीयांचे प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत. हातावर पोट असलेल्या व्यक्तींचा रोजगार हिरावला असून, समाजातील दुर्बल घटकांना विकासाच्या प्रवाहात आनण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सर्व युवक कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रमुख तानसेन बिवाल यांनी समाजातील युवकांना संघटित करुन विविध प्रश्न सोडविण्याचे कार्य भीम आर्मी करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भीम आर्मीच्या नगर शहर सचिवपदी नरेंद्र तांबोली व उपसचिवपदी धीरज बैद यांची नियुक्ती करुन उपस्थितांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी लखन टाक, यश गोहेर, सलिम शेख, अमोल सोनवणे, विक्की पंडित, किशोर बैद, मनिष सोळंकी, धरम परदेशी, भाऊ वैरागर, अतुल भुलैय्या, गब्बर लखन, सनी काकडे, सनी जगधने, बबन जगधने, संगीता डोंगरे, मनिषा पंडित, शिवम बिवाल आदी उपस्थित होते.  तसेच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना शहरात काम सुरु असलेल्या उड्डाणपुलास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

No comments:

Post a Comment