छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासनिमित्त रविवारी नगरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 17, 2021

छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासनिमित्त रविवारी नगरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

 छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासनिमित्त  रविवारी नगरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरनीय श्री.भिडे गुरूजी यांच्या प्रेरणेने धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज बलिदान मास निमित्त रविवारी दि.21 मार्च 2021 ला संताजी भवन, दाळमंडई, नगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री.बापु ठाणगे यांनी दिली.
धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महाराष्ट्रामध्ये महिनाभर बलिदान मास पाळला जातो. हा बलिदान मास महिनाभर पाळताना छत्रपती संभाजी महाराजांचेप्रेमी केश मुंडण करतात, पायात चप्पल न घालता अनवाणी रहातात, महिनाभर गोड पदार्थ खाण्याचे टाळतात, कोणत्याही उत्साही व आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी होता हिंदू धर्म रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी सोसलेल्या यातनांचे चिंतन करत धर्मरक्षणासाठी योगदान देण्याचा संकल्प करतात. नगर शहरासह जिल्ह्यातील राहुरी, पारनेर, नेवासा, श्रीरामपूर, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, कडा, आष्टी अशा विविध भागातील युवक बलिदान मास अत्यंत निष्ठेने पाळतात.
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने रविवारी दि.11 एप्रिल 2021 रोजी फाल्गुन दर्श अमावस्येला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र वडु बुद्रुक येथून नगर शहरात धर्मवीर ज्वाला आणण्याचे नियोजन प्रतीवर्षाप्रमाणे करण्यात आले आहे. या धर्मवीर ज्वालेसह सायंकाळी 5.30 वाजता नगर शहरातील माळीवाडा एस.टी.स्टॅण्डजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून श्रध्दांजली मुक पदयात्रा काढण्यात येईल. बलिदान मासच्या नित्य पूजेसाठी ज्या शिवप्रेमींना धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे छायाचित्र फ्रेमसह हवे असेल त्यांनी 9270773987 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री.बापू ठाणगे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here