”ठाणे ते श्रीक्षेत्र शेगाव” सायकल प्रवास करून प्रमोद वैशंपायन यांची पर्यावरणाविषयी जनजागृती मोहीम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 5, 2021

”ठाणे ते श्रीक्षेत्र शेगाव” सायकल प्रवास करून प्रमोद वैशंपायन यांची पर्यावरणाविषयी जनजागृती मोहीम

 ”ठाणे ते श्रीक्षेत्र शेगाव” सायकल प्रवास करून प्रमोद वैशंपायन यांची पर्यावरणाविषयी जनजागृती मोहीम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पर्यावरण प्रेमी इंजिनिअर प्रमोद वैशम्पायन यांनी ठाणे ते श्री क्षेत्र शेगाव सायकल प्रवास करून गावोगावी ग्राम विकासाची संकल्पना मांडत आहे.दररोज 15 ते 20 किलोमीटर सायकल प्रवास करतात.वड,पिंपळ,उंबर,कडू लिंब,चिंच आदी वृक्षाचे महत्व सांगून गावोगावी भेट देऊन झाडे लावा ,झाडे जगवा,पृथ्वी प्रदूषण मुक्त करा असा संदेश देत आहेत.सैन्द्रिय शेती,जलसंपदा,वन संपदा,गो संपदा या विषयावर परिसंवाद करून शेतकरी व ग्रामस्थांना विषमुक्त शेती करून सैंद्रीय पद्धतींनी पारंपरिक शेती व्यवसाय केल्यास येणार्‍या पिढी साठी सुदृढ आरोग्य लाभेल.यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.                                                                                                                          
शेण खत व गांडूळ खत तयार करून शेती केल्यास जमिनीचा पोत सुधारतो.तसेच गावोगावी वृक्षारोपण करून शाळेतील मुलांना वृक्षारोपणाचे महत्व सांगत आहेत.नगर जिल्ह्यातील कर्जुले हर्या,टाकळी ढोकेश्वर,भाळवणी,खातगाव टाकळी,निमगाव घाना,हिंगणगाव,नेप्ती,नगर असा प्रवास त्यांनी केला आहे.आय आर बी कम्पनी द्वारे नगर -पूना रस्ता चौपदरीकरण करण्यात आला.या कम्पनीचे त्यांनी अधीक्षक अभियंता म्हणून काम केले आहे.नगर येथे माणिकनगर येथे ते वास्तव्यास होते.नगरच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

No comments:

Post a Comment