सर्वांनी मिळून काम केल्यास 5 स्टार मानांकन मिळेल.उपायुक्त यशवंत डांगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 10, 2021

सर्वांनी मिळून काम केल्यास 5 स्टार मानांकन मिळेल.उपायुक्त यशवंत डांगे

 सर्वांनी मिळून काम केल्यास 5 स्टार मानांकन मिळेल.उपायुक्त यशवंत डांगे  

मनपाची आढावा बैठक संपन्न...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नागरिकांनाही स्वच्छ भारत अभियानामध्ये सामावून घ्या. ओला व सुका कचर्‍याचे नियोजन करून नागरिकांमध्ये जनजागृती करा. रस्त्याच्या कडेला मातीचे ढिगारे दिसता कामा नये. बांधकाम विभागामार्फत शहरातील रस्त्याची कामे सुरू असून रस्त्यावरील उरलेले मटेरियल ठेकेदाराला उचलण्याच्या सुचना देण्यात याव्यात. आपण सर्वजण मिळून काम केल्यानंतर 5 स्टार मानांकन मिळेल अशी आशा उपायुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केली.
केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियाना मधील 5 स्टार मानांकन मिळविण्यासाठी उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांनी घनकचरा विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना विविध उपाय योजनांच्या सुचना केल्या या प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी अनेक कर्मचारी व अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 5 स्टार मानांकन मिळण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची खरी गरज आहे. 5 स्टारचे मानांकनचे नियम प्रत्येकाने पाळणे गरजेचे आहे. यासाठी घनकचरा विभागाच्या कर्मचार्‍यां मार्फत शहरामध्ये सध्या काम सुरू आहे. आम्ही सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे वर्षभर दररोज काम करित आहोत. आताही 5 स्टार मानांकनासाठी काम करित आहोत. माजी जिल्हाधिकारी तथा आयुक्त श्री.राहुल द्विवेदी यांनी मनपाच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना रस्त्यावर काम करण्यास उतरवले होते. तेव्हा कुठे देशामध्ये आपण अंवलस्थानी आलो होतो. याचबरोबर नगरसेवक लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुढे येवून शहरामध्ये काम केल्यास नक्कीच आपण 5 स्टार मानांकन मिळवू असे उपायुक्त यांना कर्मचार्‍यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियान व राज्य सरकारचे माझी वसुंधरा अभियानामध्ये भाग घेतला असून हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी मनपाचे अधिकारी, कर्मचारी सरसावले आहेत.

No comments:

Post a Comment