छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचे अराध्य दैवत ः शाम नळकांडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 31, 2021

छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचे अराध्य दैवत ः शाम नळकांडे

 छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचे अराध्य दैवत ः शाम नळकांडे


अहमदनगर ः
जय भवानी, जय शिवाजी’ किंवा ’छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणा ऐकल्यावर अंगात वीरश्री न संचारणारा महाराष्ट्रीयन विरळाच! छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. देव, देश अन् धर्मासाठी त्यांनी सर्व जाती- धर्माच्या ’मावळ्यांना’ बरोबर घेऊन गाजवलेला पराक्रम आजही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन नगरसेवक शाम नळकांडे यांनी व्यक्त केले.
कल्याण  रोड वरील शिवाजी नगरमध्ये नगरसेवक शाम(आप्पा) नळकांडे मित्र मंडळ व बालाजी विठ्ठल रुक्माई देवस्थानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते , नगरसेवक शाम नळकांडे, सुशांत शिंदे, स्वप्निल गडाख, उमेश कटारिया, तुकाराम पवार, प्रशांत शिंदे, पांडुरंग मोरे, राजकुमार दुबे, युवराज नळकांडे, चिकू भालशंकर,भैय्या गडाख, बाबु शिंदे ,अभिषेक ठेकाले, पप्पु भाले, किशोर शिंद विशाल लोळगे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment