बाळ बोठे, कसा पकडला? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 15, 2021

बाळ बोठे, कसा पकडला?

 बाळ बोठे, कसा पकडला?

जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केला पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा सन्मान.

पत्रकारिता.. ते गुन्हेगार! “वो बुलाती है.. मगर जानेका नही...” हनीट्रॅपचा चक्रव्युह शोधण्याचे पोलिसांपुढे आवाहन ! 

‘बाजीगर’ अधिकार्‍यांनी सांगितला हैद्राबादमधील थरार...

पत्रकारितेची सुरुवात ‘क्राइम बीट’ पासूनच करणारा.. गुन्हेगारी क्षेत्राचं अवलोकन, मूल्यमापन, बातमीत करीत असताना, पोलिस प्रशासनातील बारकावे शोधणारा. सन्मान. दबदबा निर्माण करण्यासाठी मिळेल त्या मार्गाने पीएचडी, पुरस्कार मिळविणारा. नामांकित पत्रकार बाळ बोठे 3 महिने ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला. पण जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या अतिशय गोपनीय मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने अविरत परिश्रम करून थंड डोक्याने. या मास्टर माईंड कोल्ड क्राईम गुन्हेगारांच्या मुसक्या कशा आवडल्या ते पाहणे व त्याचा अनुभव शब्दातून ऐकणे थरारक व अविश्वसनीय आहे. पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी बाळ बोठेला नेमकं कसं पकडलं, या मिशनमध्ये किती आणि कशा अडचणी आल्या, बोठे पोलिसांना कसा चकवा द्यायचा, बाळ बोठेला पकडताना कसा एखाद्या चित्रपटाप्रमाणे थरार रंगला होता, याचा अनुभव स्वतः टीम प्रमुखांनी सांगितला आहे. बाळ बोठे साडेतीन महिने पोलिसांना कसा गुंगारा देत होता? तो कुठे लपला? सर्च ऑपरेशन कसे राबविण्यात आले? हे सर्व त्याचे शब्दात...


अहमदनगर -
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांस पारनेर न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आता हा त्याचे कारण शोधणे, व पुरावे गोळा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. बोठेंच्या मोबाईल डेटा शोधण्यासाठी बोठे कडून पासवर्ड घेऊन त्यातील महत्त्वाची माहिती शोधणे पोलिसांना सोपे जाणार आहे. सराईत गुन्हेगाराला लाजवील अशी व्युह रचना करणारा बोठेेने या प्रकरणातून सुटका करण्यासाठी अनेक कुल्पुत्या राबविल्या. पण जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटलांनी आपल्या कुशल अनुभवाचा वापर करून बोठे भोवतीचा फास अधिकच घट्ट केला आहे बोठे फरार कसा झाला? त्याला कोणाचे पाठबळ होते? पत्रकारितेत असताना त्याने सकाळ वृत्तपत्रातून लिहिलेल्या “वो बुलाती है” मगर जाने का नही.. या हनीट्रेपच्या चक्रव्यूहात कोणी सावजं गुंतली आहेत का? त्याने मिळविलेल्या पीएचडीच्या पदव्या, कमावलेली गडगंज संपत्ती. या प्रश्नांची उत्तरे पोलिस यंत्रणा शोध घेईल यात शंका नाही.
नगरहून पोलिसांची पाच पथके पाठवण्यात आली होती व एक पथक सोलापूरचे होते. या सहा पथकांनी पाच दिवस हैदराबादचा प्रत्येक भाग पिंजून काढला. या सहा पथकांतील समन्वयासाठी स्वतंत्र कंट्रोल रुम करण्यात आली होती. आरोपीला मदत करणारे तेथील नेटवर्क मोठे असल्याने ते भेदून आरोपीपर्यंत जाण्याचे आव्हान होते. सहा दिवसांच्या या मोहिमेचा शेवट बोठे सापडण्यात झाल्याने या पथकांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले, असे पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या उपस्थितीत या पथकांतील अधिकारी व कर्मचार्यांचा गौरव करण्यात आला. हैदराबाद येथे तब्बल 5 दिवस अहोरात्र प्रयत्न करणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा काल प्रशंसा पत्र देवून गौरव करण्यात आला समानार्थी - पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव (कर्जत) व संभाजी गायकवाड (जामखेड), सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप (नगर तालुका) व सोमनाथ दिवटे (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा). महिला पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी (आर्थिक गुन्हे शाखा) तसेच पोलिस कॉन्स्टेबल सुनील खैरे व शाम जाधव (दोघे कर्जत), प्रकाश वाघ व रणजित जाधव (स्थानिक गुन्हे अन्वेषण), सत्यजित शिंदे व दत्ता चौगुले (दोघे पारनेर), सुरेश सानप व भास्कर मिसाळ (दोघे एमआयडीसी), महिला पोलिस नाईक जयश्री फुंदे (नगर तालुका), अविनाश ढेरे, हनुमंत अडसूळ व संग्राम जाधव (तिघे जामखेड), चालक पोलिस राहुल डोळसे, रितेश वेताळ, रविकिरण सोनटक्के व दिलीप शिंद्रे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी बाळ बोठेला (इरश्र इेींहश) अटक करणार्‍या पोलिसांचा अहमदनगरमध्ये सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रशस्तीपत्र देऊन पोलीस अधिकारी आणि टीमचं अभिनंदन केलं. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड तसेच पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या विशेष टीमने ही कामगिरी केली.

बाळ बोठेला मी पहिल्यांदा बेड्या ठोकल्या...
  आरोपीला समजलं होतं की पोलीस मागावर आहेत. बाळ बोठेला मदत करणार्‍या वकिलाच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनला बोलावलं. त्यामुळे वकील येताच त्याला अटक केली. बाळ बोठेचे ठिकाणे समजले. हैदराबादपासून तो वीस किमी अंतरावर असल्याचं समजलं. तो दाटीवाटीचा परिसर होता. चार कर्मचार्‍यांच्या दोन टीम करुन पेईंग गेस्ट रुम चेक केल्या.

लॉजच्या रजिस्टरवर बाळ बोठेचं नाव - आम्हाला संशय असलेला लॉज पाहिला. तिथे रजिस्टरमध्ये बाळ बोठेचं नाव सापडलं. आम्ही खुश झालो. पण तितक्यात रुमची चावी तिथेच दिसली. त्यामुळे हा रुमला लॉक करुन बाहेर गेला की काय, असा संशय आम्हाला आला. पण बाळ बोठे हा एक पाऊल पुढे असलेला आरोपी आहे. तो एका रुमला लॉक लावून दुसर्‍या रुममध्ये लपून बसला होता. आम्हाला खात्री पटताच आधी गेट लॉक केला. कर्मचार्‍याने बाळ बोठेचा दरवाजा वाजवला. पाच सेकंदात त्याने दरवाजा उघडला, ‘मी पटकन आत शिरुन म्हटलं, मी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, अहमदनगरहून आलोय काही गडबड करायची नाही.’ त्यानंतर एसपींनी त्याच्याशी फोनवर बातचित केली आणि का पळतोयस, असं विचारलं. त्यानंतर बाकीचे पोलीस कर्मचारीही घटनास्थळी आले. - चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक कर्जत पोलीस स्टेशन


वरिष्ठ पोलिसांकडून कमालीची गुप्तता
  सुरुवातीला सहा जणांचं पथक रवाना झाली होती. अहमदनगरहून आधी सोलापूर आणि मग आम्ही हैदराबादला गेलो. हळूहळू माहिती मिळत गेली. आपण कोणतं काम करायला निघालो आहोत, हे आम्हाला नंतर समजलं, इतकी गोपनीयता बाळगण्यात आली होती. तिथे पोहोचल्यावर एक दिवस प्लॅन वर्कआऊट केला झोपडपट्टीतील दोन आरोपी बाळ बोठेला मदत करत होते. ते दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार होते. हैदराबाद पोलीसही त्या दोघांना शोधत होते. आधी त्या दोघांना ताब्यात घेतलं. बाळ बोठे कोणाच्या आश्रयाला हे समजलं, त्यानंतर प्लॅन तयार केला. आमची एकच चूक झाली, आणि आम्ही पोहोचणार तोच पाच मिनिटाआधी बाळ बोठे फरार झाला. तो एरिआ आम्हाला नवीन होता, त्यामुळे गडबड झाली आम्ही दुसर्‍या तयारीला लागलो. तो जिथे राहत होता, तो भाग सील केला. एसपींनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सरांची टीम रवाना केली. गायकवाड यांची टीम आली. प्रत्येक तासाने लोकेशन चेक केलं जात होतं. वरिष्ठ रात्रंदिवस बाळ बोठेचा ठावठिकाणा शोधत होते. महिला वकील त्याला मदत करत होती.
- राजेंद्र सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक नगर तालुका.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here