दुध भेसळ पावडर जप्त! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 3, 2021

दुध भेसळ पावडर जप्त!

 दुध भेसळ पावडर जप्त!

दुध संकलन केंद्रावर अन्न औषध प्रशासनाचा छापा..



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर अन्न व औषध प्रशासन विभागाने आज राहुरी तालुक्यातील दोन दूध संकलन केंद्रांवर छापा मारून दूध भेसळीसाठी वापरण्यात आलेली व्हे पावडर व भेसळयुक्त दूध जप्त करून दूध संकलन केंद्र बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

सदर घटनेची हकीकत अशी की दिलीप रघुनाथ म्हसे यांच्या गोरक्षनाथ दूध संकलन केंद्र व रमेश पाटीलबा म्हसे यांच्या म्हसे पाटील दूध संकलन केंद्र दोन्ही करपारवाडी, शिलेगाव कोंदवड ता. राहुरी जि.अहमदनगर येथे सकाळी साडेसात वाजता छापा टाकला असता गोठ्यामध्ये दूध भेसळीसाठी साठविलेली 100 किलो व्हे पावडर, 40 लिटर व्हे पावडर द्रावण व 300 लिटर गाईचे दूध असा एकूण 24 हजार 931 रुपये किंमतीचा साठा जप्त केला. श्री रमेश पाटीलबा म्हसे यांच्या संकलन केंद्रावर 15 किलो व्हे पावडर व 300 लिटर भेसळयुक्त गाय दूध असा एकूण 11 हजार 700 रुपये किंमतीचा साठा जप्त केला. भेसळयुक्त दुधाचे नमुने विश्लेषणासाठी घेतले असून भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. दोन्ही दूध केंद्रांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
दोन्ही व्यवसायिक दररोज 700 ते 750 लिटर दूध शेतकर्‍यांकडून संकलित करून त्यामध्ये व्हे  पावडर चे तयार केलेले 250 ते 300 लिटर दूध असे मिश्रण करून 1000 लिटर दूध पुढे विहित करीत असल्याचे दिसून आले. अन्नसुरक्षा अधिकारी  प्रशांत कुठे, शरद पवार, नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर यांनी सहाय्यक आयुक्त एस पी शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment