मनपाकडून चार पथकांची स्थापना! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 17, 2021

मनपाकडून चार पथकांची स्थापना!

 मनपाकडून चार पथकांची स्थापना!

सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर न करणार्‍यांवर आता दक्षता पथकांचा वॉच.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना नागरिक मात्र सर्व नियम धुडकावत आहेत. सॅनिटायझर व मास्कचा वापर, कोरोना डिस्टंन्सिंग चे पालन करणे कोरोना या दुसर्‍या लाटेत विसरून गेले आहेत. याची गंभीर दखल घेऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाने चार दक्षता पथकाची स्थापना केली आहे. शहरातील प्रमुख ठिकाणांवर होणार्‍या गर्दीवर चार दक्षता पथकाची वॉच राहणार आहे.
प्रभाग 1 मध्ये परिमल निकम हे पथक प्रमुख तर प्रभाग 2 मध्ये शशिकांत नजान, प्रभाग 3 मध्ये उपायुक्त संतोष लांडगे, प्रभाग 4 मध्ये कल्याण बल्लाळ हे पथक प्रमुख असणार आहेत. त्यांच्याबरोबर दोन मनपा व पोलीस कर्मचारी असणार आहेत. या पथकाकडून विना मास फिरणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच 200 रुपये दंड करण्यात येणार आहे. पथकाकडून हॉटेल, मंगलकार्यालये, जिम, चौका चौकातील गर्दीची ठिकाणांची पाहणी केली जाणार आहे. तसेच शहरात कोरोनाचा वाढता पादुभाव लक्षात घेता मनपा प्रशासनाने सहा ठिकाणी कॅन्टोन्मेंट झोन जाहीर केले आहेत. सावेडीतील बालिकाश्रम रस्ता, सिव्हील हडको, तर कोहिनूर मंगल कार्यालय परिसराचा समावेश आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.


No comments:

Post a Comment