अनिलभैय्या हिंदूत्वासाठी लढणारे सच्चा कार्यकर्ते - अ‍ॅड. आगरकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 12, 2021

अनिलभैय्या हिंदूत्वासाठी लढणारे सच्चा कार्यकर्ते - अ‍ॅड. आगरकर

 अनिलभैय्या हिंदूत्वासाठी लढणारे सच्चा कार्यकर्ते - अ‍ॅड. आगरकर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भाजप-शिवसेनेचे आमदार म्हणून अनिल राठोड यांनी नगर शहरासह जिल्ह्यात मोठे काम केले. हिंदूत्वाचे मोठे प्रचारक म्हणून ते कार्यरत होते. जिल्ह्यात हिंदूत्व रुजविण्याचे काम त्यांनी केले. शिवसेना - भाजपाची युती असल्याने या युतीच्या माध्यमातून महानगरपालिका तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनिल राठोड यांच्या सहकार्याने सत्ता मिळविता आल्या. भैय्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली, त्याचा उपयोग नेहमीच युतीसाठी, हिंदूत्वासाठी झाला.   सर्वसामान्यांमध्ये भाजप-सेनेविषयी जो विश्वास निर्माण केला आहे तो प्रत्येकाच्या मनात आजही आहे. त्यांचे कार्य कोणीही विसरु शकत नाही, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी केले.
माजी आ.अनिलभैय्या राठोड यांच्या जयंतीनिमित्त भाजपाच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, प्रा.भानुदास बेरड,विक्रम राठोड, सचिन पारखी, महेश नामदे, मयुर बोचुघोळ, राजेंद्र सातपुते आदि उपस्थित होते. याप्रसंगी वसंत लोढा म्हणाले, भाजप-शिवसेना युतीने शहरातील विकास कामांत मोठे योगदान दिले. या युतीचे शिल्पकार म्हणून स्व.अनिल भैय्या होत. सर्वांना बरोबर घेऊन सर्वसामान्यांसाठी लढण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वांना भावत. नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे, ही त्यांची प्रथम प्राधान्य असत. याप्रसंगी प्रा.भानुदास बेरड, सचिन पारखी यांनीही स्व.अनिल राठोड यांच्या कार्याचा उल्लेख केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here