गंभीर त्रुटी आढळल्याने हॉटेल औरस (हॉटेल कपिराज)चा परवाना 7 दिवसांसाठी रद्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 31, 2021

गंभीर त्रुटी आढळल्याने हॉटेल औरस (हॉटेल कपिराज)चा परवाना 7 दिवसांसाठी रद्द

 गंभीर त्रुटी आढळल्याने हॉटेल औरस (हॉटेल कपिराज)चा परवाना 7 दिवसांसाठी रद्द

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई...

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः किचनमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळांचा वावर, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा वापर, मरून पडलेली झुरळे, फ्रिज डीपफ्रिज मध्ये लेबल नसणारे अन्नपदार्थ इ. गंभीर त्रुटी आढळणार्‍या नगर-मनमाड रस्त्यावरील सावेडीतील हॉटेल औरस यांचा परवाना अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सात दिवसासाठी रद्द करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन राज्य अहमदनगर यांच्यावतीने अहमदनगर शहरांमध्ये  डिसेंबर 2020 मध्ये राबविण्यात आलेल्या नववर्षाच्या स्वागताचे निमित्त हॉटेल तपासणी मोहीमे अंतर्गत हॉटेल औरस हॉटेल कपिराज, नगर मनमाड रोड सावेडी अहमदनगर याची तपासणी दि 30 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती.
तपासणीवेळी हॉटेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गंबीर त्रुटी आढळून आल्या. प्रामुख्याने किचनमध्ये झुरळांचा वापर मोठ्या प्रमाणात आढळून आला. काही मशनरी मध्ये झुरळे मरून पडल्याचे आढळून आले. किचन मध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली.कच्चे अन्नपदार्थ मुदतबाह्य झाल्याचे आढळून आले. बारमध्ये मॉकटेल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी वेगवेगळ्या फ्लेवरचे क्रश मुदतबाह्य झाल्याचे आढळून आले. हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे ब्रेड व इतर बेकरी पदार्थ यावर कोणत्याही प्रकारचे लेबल वर्णन आढळून आलेले नाही.हॉटेलमध्ये वेळोवेळी पेस्ट कंट्रोल न करणे ,गोदामा मधील अन्नपदार्थ अस्ताव्यस्त ठेवणे,. सदर ठिकाणी मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा आढळले किचन मधील फ्रीज व डीप फ्रीजमध्ये अन्नपदार्थ अस्ताव्यस्तपणे साठविणे, साठविलेल्या तयार अन्नपदार्थांवर कोणत्याही प्रकारचे लेबल नसणे कामगारांची अस्वच्छता असे दोष आढळल्यामुळे सदर हॉटेलला जानेवारी 2021 रोजी सुधारणा नोटीस देण्यात आली या नोटीसला संबंधित हॉटेलने मुदतीत काहीही खुलासा दिला नाही म्हणून 1 फेब्रुवारी  रोजी  फे रतपासणी केली असता  34 मुद्द्यापैकी केवळ 6 मुद्द्यांची पुर्तता करण्यात आली याबाबत हॉटेलची सुननावणी 25 फेब्रुवारी  घेण्यात आली.त्यावेळीही समाधान कारक खुलासा न केल्याने हॉटेलचा परवाना सहाय्यक आयुक्त परिमंडळ 01, अन्न व औषध प्रशासन, अहमदनगर यांनी 26.4.2021 ते 2.5 2021 पर्यंत सात दिवसांसाठी निलंबित केलेला आहे.निलंबन कालावधीमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करू नये असे निर्देश देण्यात आले आहे. ही कारवाई शिंदे सहाय्यक आयुक्त अन्न अहमदनगर परिमंडळ 01 यांच्या मार्गदर्शनाखाली पवार अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment