अमरधाममध्ये अस्थी रक्षाची विटंबना, कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 8, 2021

अमरधाममध्ये अस्थी रक्षाची विटंबना, कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी

 अमरधाममध्ये अस्थी रक्षाची विटंबना, कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी

नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने आयुक्तांना निवेदन



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील नालेगाव अमरधाममध्ये अस्थीकलश कुंड बसवून देखील अमरधाम मधील कर्मचार्यांच्या दुर्लक्षामुळे रक्षा अमरधाम येथील कचर्याच्या ठिकाणी व गटारीच्या परिसरात पसरुन विटंबना होत असल्याचा आरोप करुन नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष अंतोन गायकवाड व महिला अध्यक्षा शारदा गायकवाड यांनी आयुक्तांना अमरधाम मधील कर्मचार्यांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले.
शहरातील अमरधाममध्ये रक्षा कचर्याच्या ठिकाणी व गटारीच्या परिसरात पसरुन होणारी विटंबना थांबविण्यासाठी स्थानिक नगरसेवक सुभाष लोंढे, उमेश (गणेश) कवडे, सोनाली चितळे, सुवर्णा गेनाप्पा यांच्याकडून ना हरकत दाखला घेऊन, आयुक्तांच्या परवानगीने अस्थिकलश कुंड बसविण्यात आले. तर अस्थीकलश कुंडातील रक्षा देखील असोसिएशनच्या वतीने पैठण येथील गंगा-गोदावरी येथे विसर्जित करण्याची जबाबदारी स्विकारण्यात आली आहे. तरी देखील अमरधाममध्ये अस्थी रक्षा अस्थीकलश कुंडात न टाकता कचर्याच्या ठिकाणी व गटारीच्या परिसरात टाकून दिल्या जात असल्याचा आरोप असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे. अमरधाममधील कर्मचार्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडत असून, सदर कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment