पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानगंगा विद्यार्थ्या पर्यत नित्य पोहचली पाहिजे ः आ. दराडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 26, 2021

पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानगंगा विद्यार्थ्या पर्यत नित्य पोहचली पाहिजे ः आ. दराडे

 पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानगंगा विद्यार्थ्या पर्यत नित्य पोहचली पाहिजे ः आ. दराडे


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः पुस्तके हि ज्ञानाची गंगोत्री आहेत. पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानगंगा विद्यार्थ्या पर्यत नित्य पोहचली पाहिजे. असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे  यांनी केले.  

आमदार स्थानिक  विकास निधीतून पुस्तक  वाटप कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणुन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माध्यमिक शिक्षण अधिकारी रामदास हराळ, भविष्य निर्वाह आणि वेतन पथक अधीक्षिका श्रीमती स्वाती हवेले, हे प्रमुख अथिति म्हणून उपस्थित होते. महर्षी ग.ज.चितांबर विदयालयात हा कार्यक्रम पार पडला. विविध शाळांचे शिक्षक यावेळी उपस्थित होते.प्रत्येक प्रशालेस 111 पुस्तकांचा संच वितरित करण्यात आला.विविध विषयावरील पुस्तकांचा यात समावेश आहे. अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कितीही वाढला तरी पुस्तक वाचनाचे महत्व अनन्य साधारण आहे. असे माध्यमिक शिक्षण अधिकारी रामदास हराळे म्हणाले,प्रमुख अथिती म्हणून ते बोलत होते.स्वाती हवेले, रामदास रोहोकले,अप्पासाहेब शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापिका अपर्णा लाड यांनी प्रास्ताविक केले.विजय कुलकर्णी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्र संचालन केले.जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित,तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोहोकले,शिक्षक नेते अप्पासाहेब शिंदे,महेंद्र हिंगे ,सुनील दानवे,भास्कर सांगळे तसेच विविध शाळांचे शिक्षक शिक्षकेतर प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक दशरथ पाटील यांनी केले.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here