सरकार जनतेसाठी काम करत नसून स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहेत- भैय्या गंधे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 22, 2021

सरकार जनतेसाठी काम करत नसून स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहेत- भैय्या गंधे

 सरकार जनतेसाठी काम करत नसून स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहेत- भैय्या गंधे  

शहर जिल्हा भाजपाच्यावतीने आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करुन निदर्शने


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. असे विधान मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले. ही बाब गंभीर असून या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. या सरकारचा आपल्या मंत्र्यांवर कोणताही वचक राहिला नसून, प्रत्येक मंत्री आपल्यासच धुंदीत आहे. भ्रष्टाचार, बलात्कार, खून, दरोडे असे प्रकार सरकारमधील सहभागी मंत्री, आमदारांकडून होत आहेत. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा काहीच अधिकार नाही. सत्तेचा दुरुपयोग करुन ‘उपभोग’ घेण्याकडेच मंत्र्यांचे लक्ष आहे. जनतेचे त्यांना काहीही देणे घेणे नाही. सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले असून, त्यामुळे अनेकांची नोकरी, रोजगार, कामधंदे बुडाले आहेत. जनता औषधावचून मरत आहे, परंतु हे सरकार फक्त आपल्या फायद्यासाठी अनेकांचे बळी देत आहेत. कोरोनाची भिती घालून यांचे अनाधिकृत उद्योग सुरु आहेत. दिवसेंदिवसे सरकारमधील एक-एक मंत्र्यांची नावे विविध प्रकारणातून पुढे येत आहेत. हे सरकार जनतेसाठी काम करत नसून स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही, असा घणाघाती आरोप भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केला.
शहर जिल्हा भाजपाच्यावतीने प्रोफेसर कॉलनी चौकात आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करुन निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, अ‍ॅड.अभय आगरकर, वसंत लोढा, संघटन सरचिटणीस विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, नगरसेवक उदय कराळे, विलास ताठे, रविंद्र बारस्कर, शुभांगी साठे, सभागृहनेते मनोज दुलम, प्रा.भानुदास बेरड, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, सचिन पारखी, शिवाजी दहिंडे,  महिला अध्यक्षा अंजली वल्लाकट्टी, संगीता खरमाळे, मंडल अध्यक्ष वसंत राठोड, सतिश शिंदे, अजय चितळे, महेश तवले,  ज्ञानेश्वर काळे, बाळासाहेब गायकवाड आदि उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे  म्हणाले, आज जनता कोरोना, वीज बील, महागाईने होरपळत असतांना नागरिकांना दिलासा देण्याऐवजी हे सरकार मधील मंत्र्यांचे एक-एक कारनामे बाहेर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला. तर आता सध्याचे गृहमंत्री हे पोलिसांकरवी हप्ते गोळा करण्याचे काम करत आहेत, आणि विशेष म्हणजे ही बाब माजी पोलिस आयुक्तांनी निदर्शनास आणुन दिली हे महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांचा प्रशासनाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करत आहेत हेच यातून दिसून येते. त्यामुळे सरकार भ्रष्टाचार करण्यातच गुंतले आहे, त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा काहीएक अधिकार नाही. याप्रसंगी वसंत लोढा, अभय आगरकर, अंजली वल्लाकट्टी, तुषार पोटे, गिता गिल्डा, महेश तवले आदिंनी सरकारच्या  कृत्यांचा पाढा वाचून सरकारवर टिका केली.
यावेळी  वंदना पंडित,  अमोल निस्ताने, संदिप अवचट, व्यंकटेश बोमादंडी, अमित गटणे, विवेक सरनाईक, साखला, हुजेफा सय्यद, सुजित खरमाळे, गणेश साठे, उमेश साठे, आकाश सोनवणे, राकेश भाकरे, यश शर्मा, आशिष देशमुख, शशांक कुलकर्णी, कैलास गर्जे, किशोर कटोरे, साहिल शेख, योगेश मुथा, डॉ.दर्शन करमाळकर, अभिजित सोनवणे, मृणाली मुथा, सुरज शिंदे, वैभव झोटिंग, सविता कोटा, प्रिया जानवे, स्वाती पवळे, सुप्रिया देपोलकर, गोखर शिंदे, नागेश शिंदे, पेमराज शिंदे, कार्तिक नगारे, सिद्धेश नाकाडे, अभिषेक वराळे, ऋग्वेद गंधे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here