‘चॅलेंजर ऑफ चॅम्प’ राज्यस्तरीय पुरस्काराने वर्षा दातीर सन्मानित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 19, 2021

‘चॅलेंजर ऑफ चॅम्प’ राज्यस्तरीय पुरस्काराने वर्षा दातीर सन्मानित

 ‘चॅलेंजर ऑफ चॅम्प’ राज्यस्तरीय पुरस्काराने वर्षा दातीर सन्मानित


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः श्रीरामपूर तालुक्यातील गटसाधन केंद्रातील विशेष तज्ञ शिक्षिका वर्षा दातीर यांनी शाळा बाह्य विद्यार्थ्यांसाठी सातत्याने प्रयत्न करुन त्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात प्रयत्न केले. शिक्षण हक्क कायद्यानुसार 3 ते 18 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासना सन 2017 पासून शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करण्याचे अभियान हाती घेतले होते. या कार्यात वर्षा दातीर यांनी मोलाची कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासन संलग्न एस.सी.ई.आर.टी. संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय चॅलेंजर ऑफ चॅम्प या विशेष पुरस्काराने ऑनलाईन पद्धतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी एनसीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे, पुणे येथील डायरच्या प्राचार्या डॉ.शोभा खंदारे, परभणीच्या शिक्षणाधिकारी सुचित्रा पाटेकर आदि उपस्थित होते. हा पुरस्कार मिळविणार्या जिल्ह्यातील त्या एकमेव शिक्षिका आहेत.
ऊस तोडणी, विटभट्टी व भटके जीवन जगणार्या पालकांची मुले शाळासोडून पालकांच्या समवेत कामानिमित्त बाहेर गांवी जात असतात. आरटीई कायद्यानुसार अशा मुलांचा शोध घेऊन त्यांच्या वयानुरुप त्यांना वर्गात दाखल करावयाचे असते. अशा मुलांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांचे समुपदेशन करुन मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी वर्षा दातीर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्या या पुरस्काराने सन्मात करण्यात आले.
वर्षा दातीर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल श्रीरामपूरचे डायरचे प्राचार्य डी.डी.सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, पं.स.सभापती संगीता शिंदे,  बीएसएनएलचे उपमंडल अभियंता वसंतराव दातीर आदिं मान्यवरांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here