विकासकामांच्या माध्यमातून प्रभाग समस्यामुक्त करू : बोरुडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, March 22, 2021

विकासकामांच्या माध्यमातून प्रभाग समस्यामुक्त करू : बोरुडे

 विकासकामांच्या माध्यमातून प्रभाग समस्यामुक्त करू : बोरुडे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः प्रभागातील नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला काम करण्याची संधी दिली. या संधीच्या माध्यमातून प्रभागातील मुलभूत प्रश्कबरोबर विकासाचे मोठे प्रकल्प राबवायचे आहेत. प्रभाग 1 हा उपनगरांचा भाग असून नवनवीन वसाहती येथे निर्माण होत आहे. या भागातही पायाभूत सुविधांपासून विकासकामे करावी लागत आहेत. भविष्यकाळात विकासकामांच्या माध्यमातून प्रभाग समस्यामुक्त करायचा आहे. यासाठी प्रभागामधील विकासकामांचे नियोजन केले असून, टप्प्याटप्प्याने सर्व कामे मार्गी लागणार आहे. आ. संग्राम जगताप व महापालिकेच्या माध्यमातून या भागामध्ये विकासाची गंगा वाहील असे कामे सुरु आहे, असे प्रतिपादन नगरसेवक डॉ. सागर बोरूडे यांनी केले.
प्रभाग क्र. 1 मधील व्यंकटेश कॉलनी येथे बंदपाईप गटार कामाचा शुभारंभ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका दीपाली बारस्कर, नगरसेविका मीनाताई चव्हाण, दिलीप जोशी, माधुरी गाडे, तुकाराम दरंदले, शोभा बत्तुल, संगीता आवारे, अशोक तळेकर, नवनाथ थोरात, अर्चना आठरे, प्रिया दातीर आदी उपस्थित होते.
नगरसेविका मीनाताई चव्हाण म्हणाल्या की, आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या तपोवन रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या रस्त्यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. तपोवन रस्ता हा भविष्यकाळामध्ये दळवळणासह एक प्रकारची बाजारपेठ येथे निर्माण होईल. नगरसेवक संपत बारस्कर यांनी विकासकामाबरोबर प्रभागामध्ये हरितप्रभाग करण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करुन लोकचळवळ उभी केली आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी बोलताना दीपाली बारस्कर म्हणाल्या की, प्रोफेसर कॉलनी चौकापासून कुष्ठधाम रस्ता, भिस्तबाग चौकापासून महालापर्यंतच्या रस्त्याचे कामही सुरू आहे. या रस्त्यामुळे उपनगराच्या विकासाला चालना मिळणार आहे. आ. जगताप यांनी या रस्त्यावरील विजवाहक तारांचे काम जमिनी अंतर्गत करण्यासाठी मोठा निधी प्राप्त केल्यामुळे ते कामही नियोजनपूर्ण सुरु आहे, असे त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here