सामाजिक संस्थांच्यावतीने शहिद दिनी रक्तदान करुन आदरंजली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 24, 2021

सामाजिक संस्थांच्यावतीने शहिद दिनी रक्तदान करुन आदरंजली

 सामाजिक संस्थांच्यावतीने शहिद दिनी रक्तदान करुन आदरंजली


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त  सामाजिक समता विचारधारा फौंडेशन, कै.गणपतराव शेकटकर सामाजिक प्रतिष्ठान, अंजना फौंडेशन अहमदनगर यांच्या एकत्रित सहसंयोजक आणि नेशनल इंटीग्रेटेड फोरम आर्टिस्ट अ‍ॅन्ड अ‍ॅक्टीविस्ट ( निफा) संवेदना फौंडेशन हरियाणा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक महाराष्ट्र बालक मंदिर सिद्धार्थनगर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.   याप्रसंगी माजी नगरसेवक अनिल शेकटकर, सामाजिक समता विचारधारा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनिल भोसले, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट यांनी रक्तदान करुन  शुभारंभ केला.
याप्रसंगी सुनिल भोसले म्हणाले,  सध्या कोव्हीड-19 या महामारी विरोधातील लढ्यामध्ये संपूर्ण भारतात रक्ताचा तुटवडा भासत आहे पुरवठा  आणि मागणी यांत तफावत वाढली आहे.आजच्या दिवशी संपूर्ण भारतात 1500 रक्तदान शिबिरांतुन 90000 हजारांहून अधिक रक्त संकलित करण्यात आले आहे तसेच सदरचे रक्तदान शिबीर भारतासहीत अमेरिका, रशिया,  आदी ठिकाणी पंधरा देशांतून एकाच दिवशी रक्त संकलनाचे कार्य हाती घेतले आहे याची दखलही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या नामांकित संस्थेनं घेतली असल्याचे श्री.भोसले यांनी सांगितले.
याप्रसंगी सुनिल सकट म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत युवकांनी रक्तदान करुन शहिद दिन साजरा करुन त्यांच्या कार्याचा खर्या अर्थाने गौरव केला आहे. अशा उपक्रमातून समाजामध्ये एकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबरच आरोग्य सेवा आबाधीत राखण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
जन कल्याण रक्तपेढी अ.नगर यांनी रक्त संकलन करुन हा कार्यक्रम यशस्वी केला. अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करुन शहिद हुतात्म्यांना आदरांजली दिली. यावेळी मानव हक्क अभियानचे अशोक भोसले, शिवराष्ट्र सेनेचे अध्यक्ष संतोष नवसुपे, गणेश शेकटकर, अंजना फौंडेशनचे अध्यक्ष ऋषीकेश इवळे, अमित भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. गणेश राजगुरु, सुदाम वैराळ, मिनाताई भोसले, उमाताई शेकटकर आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. समाजातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी प्रशासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here