झोडगे यांचे नागरदेवळे गटात दर्जेदार काम : प्रा. शशिकांत गाडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 5, 2021

झोडगे यांचे नागरदेवळे गटात दर्जेदार काम : प्रा. शशिकांत गाडे

 झोडगे यांचे नागरदेवळे गटात दर्जेदार काम : प्रा. शशिकांत गाडे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्हा परीषदेच्या माध्यमातून शरद झोडगे यांनी नागरदेवळे गटामध्ये दर्जेदार कामे केली  शेतकर्‍यांच्या रस्त्याच्या अडचणी दूर करण्यासाठी वाडया वस्त्यापर्यंत डांबरीकरणाचे रस्ते केले असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशीकांत गाडे यांनी केले.
शहापुर (ता. नगर)येथील दत्त मंदिरासमोर रस्त्याच्या कामाचा शुंभारभ  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशीकांत गाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
यावेळी गाडे म्हणाले, नागरदेवळे गट विकासाकामापासून वंचित होता. खेडोपाडी, वाडया वस्त्यावर रस्ते नव्हते  शासनाच्या योजनाचा लाभ शेतकरी गरजू कुटुंबा मिळत नव्हता. या चार वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य झोडगे यांनी गटामध्ये शासनाच्या सर्व योजना खेडयापर्यंत पोहचवल्या व त्याचा लाभ मिळवून दिला.
याप्रसंगी सरपंच देवराम भालासिंग, माच्छिंद्र कराळे, छगन लगड, भाऊसाहेब बेरड, नारायण धाडगे, सदाशिव धाडगे , विलास शेडाळे, रामभाऊ लगड, कार्यकारी अभियंता भाऊसाहेब राऊत उपस्थित होते.

No comments:

Post a Comment