फेज-2 योजना 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश- महापौर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 10, 2021

फेज-2 योजना 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश- महापौर

 फेज-2 योजना 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश- महापौर

अमृत योजना पाणीपुरवठा आढावा बैठक संपन्न.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अमृत योजने अंतर्गत मुळा डॅम पासून विळद पर्यत काम सुरू असून या पैकी काही भागामध्ये शेतकर्‍यांच्या जागेतून पाईप लाईन जात असल्याने त्यांचेशी चर्चा झालेली आहे. या ठिकाणचे काम येत्या 5 दिवसामध्ये पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले आहे. मुळा डॅम ते विळद पर्यत 3 कि.मी.काम बाकी आहे. तसेच विळद पासून वसंत टेकडी पर्यत पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. विळद येथे जलशुध्दीकरण केंद्राचे सिव्हील वर्क पूर्ण झाले असून मेकॅनिकलचे काम सुरू आहे. 30 एप्रिल पर्यंत फेज टुचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे  यांनी दिली.

शहर पाणी पुरवठा योजना फेज-2, अमृत योजनेतील पाणी पुरवठा विषयक कामाची आढावा बैठक मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी घेतली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी फेज -2 च्या कामाबाबत माहिती घेतली. फेज-2 च्या कामातील पाईप लाईन जॉईंट करणे व रस्ता क्रासिंग अशी कामे सुरू असून या कामास गती देवून 15 एप्रिल पर्यत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच ज्या भागामध्ये पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या त्या परिसरातील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन नागरिकांसाठी सुरू करण्याच्या दृष्टिने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. नागापूर येथील पाण्याच्या टाकीचे लाईन जोडण्याचे काम व इतर व्यवस्था पूर्णत्वाच्या मार्गावर असून या टाकीतून नागरिकांना पिण्याचे पाणी सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. लवकरच ही टाकी सुरू करण्यात येईल. तसेच मुकुंदनगर भागात देखील बांधण्यात आलेल्या टाकीतून बांधण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून वितरणाच्या दृष्टिने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच कल्याण रोड येथील पाण्याच्या टाकीतून या परिसरामध्ये देखील पिण्याचे पाण्याचे वितरण करण्याच्या दृष्टिने कार्यवाही करून तेथील नागरिकांना पिण्याचे पाणी लवकरात लवकर या टाकीतून मुबलक पाणी वितरण करण्याचे आदेश दिले. दि. 30 एप्रिल पर्यत फेंज -2 योजनेच्या पाईप लाईन मधून नागरिकांना पिण्याचे पाणी देण्याच्या दृष्टिने नियोजन करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी मा.आयुक्त शंकर गोरे, उपमहापौर मालनताई ढोणे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक रविंद्र बारस्कर, उपायुक्त यशवंत डांगे, संजय ढोणे, सतिष शिंदे, यंत्र अभियंता परिमल निकम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर.जी.सातपुते, अभियंता एस.टी.रोहोकले, एमजीपीचे अजय मुळे, सतिष बडे, थोरात, ठेकेदार पानसे, रितेश आगरवाल, महेश ओझा आदी उपस्थित होते.

अमृत योजनेतील पाईप लाईन टाकण्यासाठी शेतकरी जागा ताब्यात देण्यास तयार आहे. तातडीने काम सुरू करा. पाईपचा पुरवठा उपलब्ध करून ठेवणे बाबत ठेकेदाराला आदेश दिले. या योजनेच्या कामास गती देण्यात आली असून लवकरच योजनेचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टिने प्रयत्न सुरू आहेत. योजनेचे काम लवकरच पूर्ण करून शहरामध्ये नागरिकांना मुबलक पाणी देण्याच्या दृष्टिने प्रयत्न सुरू आहेत. तसेच दर मंगळवारी झालेल्या कामाबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

अमृत योजनेचे कामाची पाहणी केली आहे. ज्या ज्या ठिकाणी अडचणी होत्या त्या ठिकाणी मी स्वत: जावून नागरिकांशी चर्चा केली त्यामुळे या योजनेतील बर्‍यापैकी अडथळे दूर झाले आहेत. ज्या भागातील अडचणी सोडविण्यात आली अशा ठिकाणी काम सुरू करण्याचे आदेश दिले. फेज-2 योजनेचे कामापैकी वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण झाले असून जॉईंट व क्रॉसिंगचे काम बाकी आहे. त्यांना देखील 15 एप्रिल पर्यत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले असून रोज दिलेले काम पूर्ण करतात का नाही याबाबत संबंधीतांना पाहणी करण्याच्या सुचना दिल्या. आता कामाला गती देण्यात आली असून लवकरच काम पूर्ण होईल या दृष्टिने संबंधीत अधिकारी यांना प्रत्यक्ष कामावर पाहणी करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. - शंकर गोरे, आयुक्त मनपा

No comments:

Post a Comment