हजरत मौला अली यांची जयंती उत्साहात साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

हजरत मौला अली यांची जयंती उत्साहात साजरी

 हजरत मौला अली यांची जयंती उत्साहात साजरी

रेल्वे स्टेशन पोलीस लाईन पार्टी व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने महाप्रसादाचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर रेल्वे स्टेशन पोलीसलाईन पार्टी व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने हजरत मौला अली यांची जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त महाप्रसाद (भंडारा) वाटपाचे वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.
महाप्रसाद वाटपाचे शुभारंभ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा संघटक फिरोज पठाण, वाहीद दारूवाला, सुनील भिंगारदिवे, वसीम बागवान, जिशान जियाउद्दीन, सवारीचे मुजावर लतीफ गफ्फार राजे, जाबीर पठाण, आबीद पठाण आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रतीक बारसे म्हणाले की, हजरत मौला अली यांचा जन्मदिन दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, तसेच उपस्थित भाविकांना व समाजबांधवांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित येऊन हा जयंती उत्सव साजरा करतात. यंदा कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करीत जयंती साजरी करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
फिरोज पठाण म्हणाले की, हजरत मौला अली यांची जयंती सालाबादप्रमाणे यंदाही साजरी करण्यात येत आहे. हिंदू-मुस्लिम बांधव हजरत मौला अली यांची जयंती साजरी करतात. सध्या कोरोनाने जगभर थैमान घातले असून, यापासून सर्वांची मुक्तता करावी, अशी प्रार्थना यानिमित्त करण्यात आल्याचे ते म्हणाले.
महाप्रसादाचा मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिम बांधवांची लाभ घेत एकोप्याचे दर्शन घडविले.

No comments:

Post a Comment